Ahmednagar News : विधानसभा निवडणुका, जशा जवळ येऊ लागल्यात, तसे इच्छुकांचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील 12 मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून बऱ्याचा उलथापालथी सुरू आहेत.
श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा चेहरा आता समोर आला आहे. माजी आमदार राहुल जगताप यांनी आज शक्तिप्रदर्शन करत, पुणे इथं शरद पवार यांची भेट घेतली. राहुल जगतापांचे हे शक्तिप्रदर्शन म्हणजे, आगामी विधानसभा वस्तादाच्या मार्गदर्शनाखाली 'फिक्स', असा विरोधकांना मेसेज दिला आहे.
महाविकास आघाडीत श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारीची उत्सुकता होती. शिवसेना (Shiv Sena) उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते साजन पाचपुते यांनी मध्यंतरी जोरदार शक्तिप्रदर्शन करत, उमेदवारीवर दावा सांगितला आहे. या काळात माजी आमदार राहुल जगताप शांत बसून होती. कोणतेही राजकीय भूमिका उघडपणे घेत नव्हते. परंतु श्रीगोंद्यातील राजकीय घडामोडींवर पकड ठेवून होते. ग्रामपंचायत, बाजार समिती, कारखाना आणि जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीवर राहुल जगताप यांनी त्यांची पकड सैल ठेवली नव्हती. असे असले, तरी राजकीय भूमिका उघड घेत नसल्याने त्यांच्याविषयी संभ्रम वाढला होता.
राष्ट्रवादी (NCP) फुटल्यानंतर राहुल जगताप कोणाकडे? असा प्रश्न होता. राहुल जगताप यावर मौन बाळगून होते. अजित पवार यांनी पक्ष फुटीनंतर राष्ट्रवादीचे रायगड इथं अधिवेशन घेतले होते. काही कामानिमित्तानं राहुल जगताप यांनी अजितदादांची तिथं भेट घेतली होती. त्यानंतर आता या भेटीवर बरचं मौन बाळगून होते. त्यामुळे 'दादा की वस्ताद', असा संभ्रम वाढला होता. आता विधानसभा निवडणुका जवळ येऊ लागल्याने राहुल जगताप थेट मैदानात येऊ लागलेl. आज त्यांनी 100 वाहनांचा ताफा घेऊन पुणे इथं शरद पवार यांची भेट घेतली. राहुल जगताप यांचे हे शक्तिप्रदर्शन म्हणजे, 'वस्तादा'च्या मार्गदर्शनाखाली विधानसभा 'फिक्स', असा संदेश दिला आहे.
श्रीगोंदा कुकडी सहकारी साखर कारखाना चेअरमन माजी आमदार राहुल जगताप यांनी आज माळेगावमध्ये इंजिनिअरिंग कॉलेज शरद सभागृह येथे शेकडो कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ घेऊन शरद पवार यांची भेट घेतली. श्रीगोंदा मतदारसंघात राहुल जगताप उमेदवार असतील. नगर जिल्ह्यातील 8 जागा राष्ट्रवादी लढणार असून त्यात श्रीगोंदा जागा ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षच लढणार असल्याचे सांगितलं जात आहे. शरद पवार यांनी राहुल जगताप यांना कामाला लागा, अस सांगत आता आणलेली साकळाई आणि कुकडी बोगद्याचा प्रश्नांच निवेदन न देता हेच प्रश्न घेऊन आमदार होऊनच सोडवा, असा सल्ला शरद पवारांनी जगतापांना दिल्याचं सांगितलं जात आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी श्रीगोंद्यात शिवसेनेचा उमेदवार घोषित केला होता. साजन पाचपुते यांच्याकडे त्यांचा कल होता. श्रीगोंद्यातून साजन पाचपुते अन् पारनेरमधून राणी लंके विधानसभेत एकाच गाडीतून जातील, असं संजय राऊत यांनी म्हटलं होते. आता राहुल जगताप यांनी श्रीगोंद्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून दावा केल्यानं आणि शरद पवारांनी ग्रीन सिग्नल दिल्यानं महाविकास आघाडीत पेच वाढला आहे.
श्रीगोंद्यात 2014 च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत झाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल जगताप 99,281 मतांनी विजयी झाले होते. तर भाजपचे बबनराव पाचपुते 13,637 मतांनी पराभूत झाले होते. परंतु 2019 मध्ये राहुल जगताप यांनी निवडणुकीत्या रिंगणातून माघारी घेतली आणि भाजपने बाजी पलटली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार बबनराव पाचपुते 1,03,258 मतांनी विजयी झाले. तर राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्याम प्रतापराव शेलार यांना 4,750 मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.