Sambhajiraje News : शरद पवारांपाठोपाठ भुजबळांच्या मतदारसंघात संभाजीराजेंचा मेळावा

Yeola News : येवल्यात माजी खासदार छत्रपती संभाजीराजे मेळावा घेणार आहेत.
Chhatrapati Sambhajiraje News
Chhatrapati Sambhajiraje NewsSarkarnama

Nashik News : राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा बालेकिल्ला असलेल्या येवला मतदारसंघात गेल्या महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी सभा घेतल्यानंतर आता १० सप्टेंबरला येवल्यात माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) मेळावा घेणार आहेत. 'गाव तिथे शाखा व घर तिथे स्वराज्याचा मावळा' या अभियानांतर्गत ते नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत.

नाशिकच्या शासकीय विश्रामगृहात मंगळवारी (ता.२९) तालुकास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. पक्षाचे राज्य संपर्कप्रमुख करण गायकर अध्यक्षस्थानी होते. लोकसभा निवडणुकीत स्वराज्य संघटना स्वबळावर उतरण्याची तयारी करत आहे. नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने दिंडोरी व नाशिक असे दोन लोकसभा मतदारसंघ आहेत.

Chhatrapati Sambhajiraje News
Mamata Banerjee Rakshabandhan : 'मातोश्री'वर रक्षाबंधन ! ममता बॅनर्जींनी उद्धव ठाकरेंना बांधली राखी

मालेगाव व बागलान विधानसभांचा धुळे लोकसभेत समावेश होतो. या पार्श्वभूमीवर येवला मतदारसंघातील साधारणत, ३० गावांमध्ये स्वराज्यच्या शाखा व शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तालुक्यामध्ये सध्या असलेले प्रश्न, वर्षानुवर्ष प्रलंबित असलेल्या समस्यांची माहिती २ सप्टेंबरपर्यंत मिळवण्यात येणार आहे.

Chhatrapati Sambhajiraje News
Congress Vs BJP Politics : उल्हास पाटलांची कन्या भाजपात जाणार? काँग्रेसने स्पष्टच सांगितले

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात सभा घेतली होती. त्यानंतर आता संभाजीराजे येथे काय बोलतात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com