Tukaram Gadakh : नगर लोकसभेत राष्ट्रवादीला विजय मिळवून देणारा नेता काळाच्या पडद्याआड

राष्ट्रवादीचे माजी खासदार तुकाराम गडाख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
Tukaram Gadakh
Tukaram GadakhSarkarnama
Published on
Updated on

सोनई (जि. नगर) : नगर (Nagar) दक्षिणचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) माजी खासदार तुकाराम गंगाधर गडाख (Tukaram Gadakh) (वय ६९) यांचे शुक्रवारी (ता. २ डिसेंबर) रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन (passes away) झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, बंधू, नातवंडे, असा परिवार आहे. आज दुपारी पानसवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (Former NCP MP Tukaram Gadakh passed away)

नेवासे तालुक्यातील पानसवाडी येथील मूळ रहिवासी असलेले तुकाराम गडाख यांचा जन्म १ नोव्हेंबर १९५३ रोजी झाला. जिल्ह्यात मुलुखमैदानी तोफ म्हणून प्रसिद्ध असलेला हा लढवय्या व सडेतोड राजकीय वक्ता काळाच्या पडद्याआड गेला.

Tukaram Gadakh
महाजन-पाटलांचे आव्हान खडसे मोडीत काढणार? : जळगाव जिल्हा दूध संघासाठी पुन्हा लढाई

गडाख यांनी वयाच्या २९ व्या वर्षी (१९८२) ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली सोनई परिसर युवक संघटना काढून सामाजिक कार्यात पाऊल ठेवले. मुळा कारखान्याच्या निवडणुकीतून राजकीय कामास सुरवात केली. १९८९ ते १९९४ दरम्यान शेवगाव-नेवासे मतदारसंघाचे अपक्ष आमदार म्हणून ते विधानसभेत पोचले. लोकसभेच्या २००४ मधील निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला विजय मिळवून दिला होता.

Tukaram Gadakh
Beed : राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षाची डॉक्टर लेक आता ग्रामपंचायत निवडणुकीत नशीब आजमावणार

हनुमान ग्रामीण विकास मंडळ, पानसवाडी या त्यांच्या संस्थेची सोनई, नेवासे व शेवगाव येथे तीन प्राथमिक व माध्यमिक विद्यालये आहेत. राजकीय कार्यकाळात धार्मिक तीर्थक्षेत्रे जोडणे, बॅक वॉटरचे पाणी मिळावे, तसेच मुळा धरणावरील पाणी अडविण्यासाठी त्यांनी संघर्ष केला. बारा हजार अपंगांना साहित्याचे वाटप, मंदिरांना सभामंडप आदी लक्षवेधी काम केले.

Tukaram Gadakh
Hansraj Ahir : मागासवर्ग आयोगाची सूत्रे हाती घेताच अहिरांनी केलेले विधान भाजपला आणणार अडचणीत?

तुकाराम गडाख हे नेवासे तालुक्यात भाऊ नावाने परिचित होते. धार्मिक, कृषी, राजकीय, तसेच सामाजिक क्षेत्रात त्यांनी मोठे काम केले आहे. त्यांच्या अमोघ वक्तृत्वाची जनसामान्य जनतेवर मोठी छाप होती. सर्वसामान्य जनतेच्या हाकेला धावून येणारा एक दिलदार नेता आज हरपला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com