Tukaram Nirgude Death: शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष तुकाराम निरगुडे यांचे निधन

Shetkari Sanghatana: शेतकरी संघटनेत कार्यकर्ता ते प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी आदर्श काम केले.
Tukaram Nirgude
Tukaram Nirgude Sarkarnama
Published on
Updated on

Nashik News: शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष आणि संघटनेच्या उच्च अधिकार समितीचे सदस्य तुकाराम निरगुडे (वय ८०) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्यांची प्रकृती अस्वस्थ होती. त्यांनी मंगळवारी (ता.२७) उंबरखेड (ता.निफाड) येथे अखेरचा श्वास घेतला.

तुकाराम निरगुडे हे निफाड सहकारी साखर कारखान्यावर कर्मचारी म्हणून कार्यरत होते. १९८० च्या काळात शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन ते संघटनेत आले. त्यावेळी चाकण कांदा आंदोलनाच्या बातम्या वाचून ते प्रभावित झाले होते. शरद जोशी यांना जिल्ह्यात पहिल्यांदा निफाड सहकारी साखर कारखाना येथे ते घेऊन आले होते.

Tukaram Nirgude
Nashik Politics : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत गिते मैदानात; भाजपविरोधात रान उठवलं !

निफाडमध्ये पहिली बैठक झाली होती. त्यावेळी कारखान्याचे अध्यक्ष माधवराव बोरस्ते माधवराव मोरे, प्रल्हाद पाटील यांची जोशी यांच्याशी भेट घडवून आणली होती. १५ एप्रिल १९८० रोजी कारखान्याच्या निफाड कारखान्याच्या परिसरात शरद जोशी यांची सभा झाली होती. त्यानतंर पुढील मोठी सभा १५ ऑगस्ट १९८० ला घ्यायचं ठरलं. त्यानंतर निरगुडे यांनी पुन्हा १२ ऑगस्ट १९८० ला तिघांची भेट घडवून आणली. माधवराव मोरे, रामचंद्र बापू पाटील, यांच्यानंतर प्रांताध्यक्ष म्हणून त्यांना नाशिक जिल्ह्यातून संधी मिळाली.

Tukaram Nirgude
Narendra Modi On NCP: राष्ट्रवादीवर 70 हजार कोटींच्या भ्रष्ट्राचाराचा आरोप; पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच थेट बोलले

शेतकरी संघटनेत कार्यकर्ता ते प्रांताध्यक्ष म्हणून त्यांनी आदर्श कामकाज केले. संघटनेत झोकून देत त्यांनी काम केले. प्रांताध्यक्षपदाची संधी मिळाल्यानंतर कौटुंबिक जबाबदारी विसरून महाराष्ट्र पिंजून काढला होता. संघटनेचे कार्य वाढवले. त्यावेळी तरुणांची फळी संघटनेसोबत जोडून चळवळ बुलंद केली होती. ते संघटनेचा महत्त्वपूर्ण दुवा होते, अशा शब्दात ज्येष्ठ नेते व शेतकरी संघटनेचे माजी प्रांताध्यक्ष रामचंद्र बापू पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष ललित बहाळे, स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष अनिल घनवट, माजी आमदार वामनराव चटप, महीला आघाडीच्या नेत्या सीमा नरोडे, जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे, कार्याध्यक्ष शंकरराव ढिकले आदींनी तुकाराम निरगुडे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com