Ganesh Sugar Factory Election: गणेश कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; विखे पाटलांच्या विरोधात थोरात - अजितदादा उतरणार?

Ganesh Cooperative Sugar Factory Election : गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू
Ganesh Cooperative Sugar Factory Election
Ganesh Cooperative Sugar Factory ElectionSarkarnama

Ahmednagar News: राहता तालुक्यातील गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. या कारखान्याच्या निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून निवडणुकीसाठी 15 मे पासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर 17 जून रोजी मतदान पार पडणार आहे.

गणेश सहकारी कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विविध गटांकडून तयारी सुरू करण्यात आली आहे. यामध्ये भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखालील एक पॅनल आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पॅनल अशी लढत होण्याची शक्यता आहे. यातच काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालीही एक पॅनल असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

Ganesh Cooperative Sugar Factory Election
Shinde Vs Pawar: जामखेड बाजार समितीत दैव राम शिंदेंच्या बाजूने; ईश्‍वर चिठ्ठीतून सभापती भाजपचा तर उपसभापती राष्ट्रवादीचा

संग्राम कोते पाटील यांनी बैठका घेण्यास सुरवात केली आहे. याबाबत बोलताना संग्राम कोते पाटील म्हणाले, "आर्थिक दृष्ट्या संकटात सापडलेला गणेश सहकारी साखर कारखाना पूर्ण ताकतीने लढणार आहे. गेल्या आठ वर्षात कारखान्याचा तोटा 25 कोटींवरून 110 कोटीवर गेला आहे", असं त्यांनी सांगितलं.

"कारखान्याच्या सभासदांची होणारी लूट आणि पिळवणूक रोखण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. कुठल्याही परिस्थितीत गणेश कारखान्यावर विरोधकांचे आक्रमण होऊ देणार नाही. कारखान्याचा पुढचा गळीत हंगाम यशस्वी करण्याचं आमचं उद्दिष्ट आहे. 'गणेश'च्या सभासदांनी आमच्याकडे सत्ता दिल्यास कुठल्याही परिस्थितीत पुढील हंगाम यशस्वी करून दाखवू", असं कोते पाटील यांनी सभासदांच्या बैठकीत सांगितलं.

Ganesh Cooperative Sugar Factory Election
Mla Raju Patil News: जवळ आले नाही तर मारील...; मनसे आमदार राजू पाटील अधिकाऱ्यांवर भडकले

गणेश सहकारी साखर कारखान्यावर माजी मंत्री शंकर कोल्हे आणि शिवाजीराव कोते पाटील यांच्या पॅनलचे गेली अनेक वर्षे वर्चस्व होतं. गेल्या काही कालावधीपासून कारखाना राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली आहे. या निवडणुकीत त्यांच्या विरोधातील पॅनल देणार असल्याचं संग्राम कोते पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, संग्राम कोते पाटील हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. संग्राम कोते पाटील यांचे काका रामचंद्र कोते पाटील हे गणेश सहकारी साखर कारखान्याचे तीन वेळा संचालक होते. तर वडील अॅड. शिवाजीराव कोते पाटील हे देखील 25 वर्ष संचालक होते.

(Edited By- Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com