Nashik Political News : लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. या दृष्टीने महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी उमेदवारांसाठी मतदान वाढावे यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. महायुतीच्या उमेदवारांना वातावरण अनुकूल असल्याचा दावाही केला जात आहे.
नाशिक मतदार संघातून शांतिगिरी महाराज हे अपक्ष उमेदवार आहेत. त्यांनी जोरदार प्रचार देखील केलेला आहे. त्यांचे अनुयायी सबंध मतदारसंघात मतदारांची गाठीभेटी घेत आहेत. आध्यात्मिक क्षेत्रातील विविध कार्यकर्ते त्यांच्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे शांतिगिरी महाराज यांचा फटका कोणत्या उमेदवाराला बसेल हा चर्चेचा विषय आहे.
या संदर्भात भाजप नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांना शांतिगिरी महाराजांची Shantigiri Maharaj केलेल्या संपर्क बाबत विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, शांतिगिरी महाराज यांच्याशी मी नियमित संपर्कात आहे. मी त्यांचा भक्त देखील आहे. त्यामुळे त्यांनी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला आणि महायुतीच्या उमेदवारांना सहकार्य करावे, असे प्रयत्न केले आहेत.
महाजन Girish Mahajan म्हणाले, शांतिगिरी महाराज यांना आम्ही आमची भूमिका सांगितली. कदाचित त्यांना ती मान्य देखील झाली असावी. मात्र त्यांच्या आजूबाजूला असलेल्या कार्यकर्त्यांना ती मान्य होत नाही. ते खूपच आग्रही आहेत. त्यांच्यामुळे शांतिगिरी महाराज यांची उमेदवारी कायम आहे.
शांतिगिरी महाराज यांचा नाशिक Nashik आणि दिंडोरीसह अन्य काही मतदारसंघातही संपर्क आणि अनुयायी आहेत. त्या मतदारसंघात त्यांनी आम्हाला मदत करावी, असे आमचे प्रयत्न सुरू आहेत, असा खुलासाही महाजनांनी यावेळी केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एकंदरच शांतिगिरी महाराज यांच्या उमेदवारीमुळे हिंदुत्ववादी Hindutva मतांवर अवलंबून असलेल्या महायुतीच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. शांतिगिरी महाराज यांचा कोणाला फटका बसतो हा उत्सुकतेचा विषय आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.