Solapur, Madha Vote Counting : माढा, सोलापूरच्या मतमोजणीसाठी 672 कर्मचारी; नियुक्त कर्मचाऱ्यांना देणार ट्रेनिंग

Lok Sabha Election 2024 : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघासाठी तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान झाले. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 59.19 टक्के, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 63.65 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघाची मतमोजणी येत्या चार जून रोजी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.
Vote Counting
Vote CountingSarkarnama

Solapur, 17 May : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून करण्यात येत असून मतमोजणीसाठी कर्मचारी नियुक्तीची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आली आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी सुमारे 672 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाने तयारी पूर्ण करत आणली आहे.

सोलापूर (Solapur) आणि माढा (Madha) लोकसभा मतदारसंघासाठी (Lok Sabha Constituency) तिसऱ्या टप्प्यात सात मे रोजी मतदान झाले. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी 59.19 टक्के, तर माढा लोकसभा मतदारसंघासाठी 63.65 टक्के मतदान झाले आहे. या मतदारसंघाची मतमोजणी येत्या चार जून रोजी होणार आहे. त्या दृष्टीने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Vote Counting
Solapur Politics : भाजपचे युवा नेते, माजी नगरसेवक देवेंद्र कोठेंच्या विरोधात गुन्हा दाखल

एका विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी 14 टेबल असणार आहेत. एका टेबलासाठी तीन कर्मचारी आणि एक शिपाई, अशा एकूण चार कर्मचाऱ्यांची आवश्यकता असणार आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मोहोळ, पंढरपूर, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य असे सहा मतदारसंघ येतात.

माढा लोकसभा मतदारसंघात सांगोला, माळशिरस, माढा, करमाळा तर सातारा जिल्ह्यातील माण खटाव आणि फलटण या विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. एका विधानसभा मतदारसंघासाठी 56 कर्मचारी लागणार असून दोन्ही लोकसभा मतदारसंघातील 12 विधानसभा मतदारसंघासाठी 672 कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे, त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात आहे.

Vote Counting
Pawar-Tatkare News : पवारांचा मुक्काम असलेल्या हॉटेलला तटकरेंची भेट; अनिल देशमुखांचा दुजोरा

दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी (Vote counting) ज्या कर्मचाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. त्या सर्व कर्मचाऱ्यांना मे महिन्याच्या अखेरपर्यंत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या अगोदर मतदानासाठी नेमण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनाही प्रशिक्षण देण्यात आले होते, त्यामुळे मतदानाच्या काळात फारशा तक्रारी आलेल्या नाहीत, असा दावाही निवडणूक कार्यालयाकडून करण्यात आला आहे. ज्या काही किरकोळ तक्रारी आल्या, त्या तातडीने सोडविण्यात आल्या आहेत, असेही सांगण्यात आले.

सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे सध्या सोलापूर शहरातील रामवाडी येथील शासकीय धान्य गोदामात ठेवण्यात आलेली आहेत. या गोदामाच्या ठिकाणी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.

Vote Counting
Nashik Lok Sabha : महिलांची गर्दी न जमल्याने नीलम गोऱ्हेंचा नाशिकमधील मेळावा रद्द करण्याची नामुष्की

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com