Girish Mahajan Politics: एकनाथ खडसेंचा आरोप भाजपच्या जिव्हारी, रावेरला महाजन समर्थक संतापले!

Girish Mahajan; BJP Girish Mahajan supporters angered by NCP leader Eknath Khadse's allegations-जलसंपदा मंत्री गिरीश महाजन समर्थकांनी एकनाथ खडसे यांचा केला निषेध.
BJP Agitation at Raver. Girish Mahajan & Eknath Khadse
BJP Agitation at Raver. Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Khadse Vs Mahajan News: जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे एका `आय.ए.एस` महिलेशी संबंध असल्याचा आरोप माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी केला होता. हा आरोप राज्यभर चर्चेचा विषय बनला. त्यावरून जळगावचे राजकारण चांगलेच तापले.

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यातील राजकीय वाद सर्वश्रुत आहे. दोन्ही नेते सातत्याने एकमेकांवर आरोप करीत असतात. हे दोन्ही नेते जळगाव जिल्ह्यातील असल्याने स्थानिकसमर्थकांतही तशी विभागणी झाली आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांतून विस्तवही जात नाही.

BJP Agitation at Raver. Girish Mahajan & Eknath Khadse
Raj Thackrey Politics: महापालिकेला कडक इशारा...गोदावरी प्रदूषणाविरोधात मनसेच्या नेत्यांनी घेतल्या रामकुंडात उड्या!

श्री खडसे यांनी नुकतेच मंत्री गिरीश महाजन यांचे एका आयएएस महिला अधिकाऱ्यांची संबंध असल्याचा आरोप केला होता. त्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटली. त्यानंतर खडसे यांनी हा आरोप आपला नसून एका पत्रकाराचा असल्याचा दावा केला होता.

BJP Agitation at Raver. Girish Mahajan & Eknath Khadse
Shirdi Beggars Death: भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा तापला; ठाकरे सेनेकडून मंत्री विखे, तर खासदार लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा

त्याचे तीव्र पडसाद जळगावच्या राजकारणात उमटले आहेत. रावेर येथे ज्येष्ठ नेते सुरेश धनके, जिल्हा सरचिटणीस श्रीकांत महाजन, पद्माकर महाजन, प्रदेश सदस्य सुनील पाटील यांसह मोठ्या संख्येने महाजन समर्थकांनी एकत्र येत खडसे यांचा निषेध केला. यासंदर्भात त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. खडसे यांनी तातडीने माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

यावल येथे भारतीय जनता पक्षाचे नेते उमेश फेगडे, पांडुरंग सराफ, अतुल भालेराव, तेजस पाटील, बाळू फेगडे यांसह विविध नेत्यांनी तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांची भेट घेयली. श्री. खडसे यांच्यावर कारवाईची मागणी केली.

एकनाथ खडसे हे व्यक्तिगत राजकारणासाठी सातत्याने मंत्री महाजन यांच्याविरुद्ध राजकीय आरोप करीत असतात. कोणताही पुरावा नसताना त्यांनी आता नवा आरोप केला आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे असे त्यांनी सांगितले.

एकंदरच एकनाथ खडसे यांनी जलसंपदा मंत्री महाजन यांच्यावर आरोप करून खळबळ उडवून दिली होती. या आरोपाने भाजपमध्ये त्याची चर्चा झाली. विशेषता गिरीश महाजन समर्थकांमध्ये संतापाचे वातावरण होते. ते अद्यापही संपलेले नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात जळगावच्या राजकारणात खडसे यांनी महाजन समर्थकांना दिवचून वातावरण तापविले आहे.

------

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये Number One डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातील नवी झेप

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com