Shirdi Beggars Death: भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूचा मुद्दा तापला; ठाकरे सेनेकडून मंत्री विखे, तर खासदार लंकेंचा सुजय विखेंवर निशाणा

MP Nilesh Lanke Thackeray Shiv Sena Criticism Minister Radhakrishna Vikhe : शिर्डीतील चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यूवरून मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार नीलेश लंके यांच्यासह ठाकरे शिवसेनेने टीका करत राजीनाम्याची मागणी केली.
Shirdi beggars death
Shirdi beggars deathSarkarnama
Published on
Updated on

Shirdi Incident News : शिर्डी इथल्या चार भिक्षेकऱ्यांचा जिल्हा रुग्णालयातील मृत्यूच्या घटनेनंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकारण तापू लागलं आहे. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधण्यास सुरुवात करत, थेट राजीनाम्याची मागणी केली आहे.

खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे यांचा नाव टाळून जोरदार टीका केली. एका युवा नेत्यामुळे कधी नव्हे भिक्षेकऱ्यांवर कारवाई झाली आणि त्यांना कारागृहात डांबून ठेवले. आता प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांचा बळी गेला, अशी टीका केली.

खासदार नीलेश लंके (Nilesh Lanke) यांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या भिक्षेकऱ्यांची भेट घेतली. जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डाॅ. नागेश चव्हाण देखील यावेळी उपस्थित होते. चार भिक्षेकऱ्यांच्या मृत्यूची माहिती घेतल्यानंतर, खासदार लंकेंचा पारा चढला. प्रशासनाला कारभारावर ताशेरे ओढताना, प्रशासनाच्या हलगर्जीपणाचे बळी आहे, असा घणाघात केला.

Shirdi beggars death
Maharashtra new sand policy 2025 : महसूलमंत्री बावनकुळेंचे नवीन वाळू धोरण कोणासाठी लाभदायक?

खासदार लंके यांनी भाजपचे (BJP) माजी खासदार सुजय विखे यांचे नाव टाळत, एका युवा नेत्याच्या मागणीवरून कधी नव्हे, ती भिक्षेकऱ्यांवर कारवाई झाली. त्यांना कारागृहात डांबून ठेवण्यात आले. या बळींची जबाबदारी कोण घेणार? असा प्रश्न केला. उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या भिक्षेकऱ्यांपैकी तीन जण पळून गेले आहे, त्यांची जबाबदारी कोणाची? असा सवाल देखील खासदार लंकेंनी केला.

Shirdi beggars death
PM Modi women safety appeal : मंजुळा निघाली पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे, कशासाठी?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांनी हा मुद्दा गंभीर आहे. भिक्षेकऱ्यांचा जीव गेला अन् समिती नेमूक काय होणार आहे. कोणत्या समितीचा अहवाल येत नाही. कोणती गंभीर कारवाई होत नाही. हे आजपर्यंत पाहण्यात नाही. परंतु ही घटना गंभीर आहे. मंत्री राधाकृष्ण विखे यांनी जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. जबाबदारी न स्वीकारल्यास शिवसेना आंदोलन उभारणार असल्याचा इशारा देखील गिरीश जाधव यांनी दिला.

साई संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांच्या हत्येनंतर शिर्डीतील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी जिल्हा पोलिस दल, नगर परिषदेने अवैध व्यवसायिकांविरोधात मोहीम सुरू केली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार सुजय विखे यांनी या हत्येनंतर शिर्डीतील अवैध व्यवसायिकांविरोधात कठोर कारवाईची मागणी केली होती.

यातून शिर्डीतील भिक्षेकऱ्यांविरोधात देखील कारवाई झाली. भाविकांना अडवून, त्यांच्याकडून पैसे घेऊन नशा करणाऱ्या 60 पुरूष आणि 12 महिला, अशा एकूण 72 भिक्षेकऱ्यांना प्रशासनाने ताब्यात घेतले होते. या भिक्षेकर्‍यांची आरोग्य तपासणी करत, त्यांना न्यायालयाच्या आदेशाने विसापूर (ता. श्रीगोंदा) इथल्या बेगर होममध्ये ठेवण्यात आलं होतं. त्यातील दहा भिक्षेकऱ्यांची प्रकृती ढासळल्याने त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातीलच चौघांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com