Jalgaon News: भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या उपस्थितीत आज चाळीसगाव मतदारसंघातून आमदार मंगेश चव्हाण यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार चव्हाण यांनी शक्तीप्रदर्शन करीत सभा देखील घेतली.
राज्यात सध्या सर्वत्र निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. यानिमित्ताने भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील वातावरण निवडणुकीनिमित्ताने चांगलेच ढवळून निघाले आहे.
निवडणुकीचे अनेक किस्से घडतात. चाळीसगावला मात्र नेत्यांच्या प्रेमाचा अनोखा किस्सा समोर आला आहे. चाळीसगावचे आमदार चव्हाण यांचे मंत्री महाजन यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देखील गुड बुक मध्ये आमदार मंगेश चव्हाण आहेत.
सोमवारी आमदार चव्हाण यांच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यासाठी स्वतः मंत्री महाजन विशेष हेलिकॉप्टरने चाळीसगामध्ये दाखल झाले. त्यांच्यासोबत खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोर पाटील, आमदार चिमणराव पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष संजय पवार हेही उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता. त्यामुळे साहजिकच मंत्री गिरीष महाजन यांनी आमदार चव्हाण यांच्या कार्याचे तोंड भरून कौतुक केले. आमदार चव्हाण हे जळगाव जिल्ह्यातील सर्व रेकॉर्ड तोडून विजयी होतील, असा विश्वास यावेळी मंत्री महाजन यांनी व्यक्त केला.
त्यावर आमदार चव्हाण देखील मंत्री महाजन यांच्या प्रेमामुळे आपण कसे विकासकामे करू शकलो, हे सांगतानाच सभेच्या शेवटी त्यांनी मंत्री महाजन यांना चक्क `आय लव यू` म्हटले. त्यांच्या या वाक्याने उपस्थितांत देखील चांगल्याच शिट्ट्या, टाळ्यांतून प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सभेनंतर देखील आमदार चव्हाण यांचे `आय लव यू` हा एकच विषय जळगावच्या राजकारणात काल विषय बनला होता. नेत्यांवर प्रेम व्यक्त करण्यासाठी अनुयायी व समर्थकअनेक प्रकार करतात. त्यात नवल तरी काय. मात्र चक्क भऱ सभेत आमदार चव्हाण आय लव्ह यू म्हटले ते विरळेच.
चाळीसगाव मतदारसंघात सुमारे तीन हजार कोटीहून हून अधिक निधी विविध विकास कामांसाठी मंजूर झाला आहे. त्यात मंत्री महाजन यांचे पाठबळ आमदार चव्हाण यांना असले, तरी आमदार चव्हाण यांचा कामाची पद्धत ही देखील सर्व नेत्यांना हेवा वाटावी अशीच आहे. एखाद्या तरुण नेत्यांनी आपल्या ज्येष्ठ नेत्याला भर सभेत आय लव यू म्हणावे हे एक राजकारणातले प्रेमाचे प्रतीक म्हणावं लागेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.