Girish Mahajan and Keda Aher : केदा आहेर बंडखोरी करत उमेदवारीवर ठाम, तर गिरीश महाजनांचा हिरमोड!

Keda Aher and BJP News : भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी पक्षाच्या बंडखोर उमेदवारांना शांत करण्याचा सर्वोतोपरी प्रयत्न केला आहे
Keda Aher and BJP
Keda Aher and BJPsarkarnama
Published on
Updated on

Assembly election 2024: भाजप नेते गिरीश महाजन दोन दिवस बंडखोरांचा बिमोड करण्यासाठी नाशिकला होते. त्यांना महाराजांची समजूत घालण्यात यश आले. मात्र बंडखोर आपल्या भूमिकेवर ठाम राहिले.

नाशिक जिल्ह्यात दोन मतदारसंघात भाजपची बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांची समजूत घालण्यासाठी मंत्री महाजन नाशिकला आले होते. त्यात ते काही प्रमाणात यशस्वीही झाले नाशिक पश्चिम मतदार संघातील बंडखोरांनी आपल्या तलवारी म्यान केल्या आहेत. अन्य नाराज नेते आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात मंत्री महाजन यशस्वी झाले आहेत.

त्यासाठी त्यांनी विविध बैठका घेतल्या त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला गती येईल अशी अपेक्षा आहे. मात्र चांदवड देवळा मतदार संघातील आव्हान कायम असल्याने गिरीश महाजन यांना ठोस उपाययोजना करता आली नाही. त्यामुळे ते जळगावला परत गेले आहेत.

नाशिकहून जळगावला परत जाताना मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी भाजपचे बंडखोर उमेदवार आणि नाफेडचे संचालक केदा आहेर यांच्याशी चर्चा केली. केदा आहेर यांना त्यांनी उमेदवारी मागे घेण्याची सूचना केली. आगामी काळात पक्षाकडून केदा आहेर यांचे पुनर्वसन केले जाईल, असे ठोस आश्वासन यावेळी त्यांनी दिले. मात्र या आश्वासनाने केदा आहेर यांचे समाधान झाले नाही.

Keda Aher and BJP
Girish Mahajan : गिरीश महाजन ॲक्टिव्ह; आमदार राहुल ढिकले यांच्या प्रचाराला येणार गती!

यावेळी आहेर यांनी भाजपचे(BJP) आमदार आणि त्यांचे बंधू डॉ राहुल आहेर यांनी आपली फसवणूक केली आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर त्यांनी पक्षाच्या नेत्यांना केदा आहेर यांना उमेदवारी द्यावी, असे सांगून आपल्या भ्रमनिरास केला.

भारतीय जनता पक्षाने देखील 30 वर्ष पक्षासाठी काम केलेल्या एकनिष्ठ कार्यकर्त्यावर अन्याय केला आहे. या अन्यायाला उत्तर म्हणून देवळा आणि चांदवड मतदार संघातील जनतेने माझी उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला आहे. चांदवड, देवळा मतदार संघात सध्या माझी उमेदवारी नसून ही उमेदवारी जनतेची आहे. त्यामुळे आपण उमेदवारी बाबत ठाम आहोत. उमेदवारी मागे घेण्याची वेळ निघून गेली आहे, असे आहेर यांनी मंत्री महाजन यांना सांगितल्याचे कळते.

Keda Aher and BJP
Ramdas Athawale : आठवले समर्थक संतापले, प्रचारासाठी महायुतीशी असहकार!

मंत्री महाजन यांनी आपल्या दोन दिवसाच्या दौऱ्यात भारतीय जनता पक्षातील विधानसभा निवडणुकीच्या मतदारसंघांमध्ये यंत्रणा सक्रिय करण्यात यश मिळवले. आता नाराज पदाधिकारी देखील प्रचारायला लागले आहे. मात्र बंडखोर उमेदवार रिंगणात कायम असल्याने त्यांचा हा दौरा पूर्णतः यशस्वी झाला, अशी स्थिती नाही.

विशेषतः नाशिक पश्चिम मतदारसंघ पक्षाचे नेते दिनकर पाटील यांनी राजीनामा देऊन मनसेची उमेदवारी केली आहे. कळवण येथे भाजप नेत्याने अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. सध्या सर्वात मोठे आव्हान चांदवड देवळा मतदार संघात आहे. त्यावर आगामी काळात काय उपाय योजना केली जाते याची उत्सुकता आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com