Ramdas Athawale : आठवले समर्थक संतापले, प्रचारासाठी महायुतीशी असहकार!

Ramdas Athawale seat Allocation Controversy: जागा वाटपात महायुतीने अन्याय केल्याने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले समर्थक संतापले
Ramdas Athawale & Devendra Fadanvis
Ramdas Athawale & Devendra FadanvisSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: भारतीय जनता पक्षासह महायुतीच्या उमेदवारांना बंडखोरांची डोकेदुखी आहे. त्यात आता एक नवी भर पडली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात महायुतीच्या प्रचाराची गाडी केव्हा रुळावर येणार याची चर्चा आहे.

महायुतीच्या जागा वाटपात घटक पक्षांना अपेक्षित स्थान मिळालेले नाही. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाने राज्यात १२ जागांवर उमेदवार देण्याची मागणी केली होती. प्रत्यक्षात मात्र या पक्षाला एकही जागा मिळालेली नाही.

त्याची नाराजी आता विविध भागातून उमटू लागली आहे. नंदुरबार जिल्ह्यात आठवले समर्थकांनी महायुतीच्या प्रचारात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांना आठवले समर्थकांना प्रचारात सहभागी करण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.

यासंदर्भात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि सहकारी आघाड्यांची बैठक नुकतीच झाली. यावेळी जिल्हाप्रमुख अरविंद कुवर आणि जिल्हा समन्वयक अशोक शिरसाठ यांचं विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.

Ramdas Athawale & Devendra Fadanvis
Girish Mahajan : गिरीश महाजन यांची पदाधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत पंचतारांकित मनधरणी!

नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहेत. या सर्व जागांवर भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिले आहेत. सहकारी पक्षांना एकही मतदार संघ सोडलेला नाही.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला नाशिक विभागातील दोन जागांसह राज्यात १२ जागा मिळाव्यात, अशी अपेक्षा होती. मात्र भारतीय जनता पक्षाने याबाबत केवळ आश्वासन देऊन बोळवण केली आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला भाजपकडून जागावाटप प्रक्रियेत सन्मान जनक स्थान दिले जात नाही. त्यामुळे राज्यातील पदाधिकाऱ्यांना योग्य संधी मिळत नाही. राज्य शासनाने नुकत्याच विविध महामंडळे आणि समित्यांचे प्रमुख नियुक्त केले.

Ramdas Athawale & Devendra Fadanvis
Chhagan Bhujbal: भुजबळ का म्हणाले, "२३ तारखेला होणार मोठा धमाका"

राज्य सरकारने केलेल्या या नियुक्त्यांमध्ये देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या पदाधिकाऱ्यांना योग्य स्थान मिळाले नव्हते. याबाबतचे नाराजी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कळवली आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोणत्याही कार्यकर्त्याने महायुतीच्या प्रचारात सहभागी होऊ नये. कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी परस्पर पत्र काढू नये. असे पत्र काढल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल.

जोपर्यंत पक्षनेते केंद्रीय राज्यमंत्री आठवले यांच्याकडून सूचना येत नाहीत, तोपर्यंत कोणीही प्रचारात सहभागी होणार नाही असे यावेळी स्पष्ट करण्यात आले. नंदुरबार जिल्ह्यात चार मतदारसंघ आहे. या मतदारसंघांमध्ये भारतीय जनता पक्षाने उमेदवार दिले आहेत. त्यात तीन मतदारसंघात महायुतीचे बंडखोर उमेदवार आहेत.

अक्कलकुवा मतदारसंघात भाजपच्या माजी खासदार डॉ हिना गावित यांनी अपक्ष उमेदवारी केली आहे. त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना बंडखोरांच्या समस्येने ग्रासले असताना त्यात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या असहकाराने नवी भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com