Girish Mahajan News ; एकीकडी ‘लक्षवेधी’ मांडायची, दुसरीकडे धमकी द्यायची!

मंत्री गिरीश महाजन यांचा पत्रकार परिषदेत एकनाथ खडसेंना टोला
Girish Mahajan & Eknath Khadse
Girish Mahajan & Eknath KhadseSarkarnama

जळगाव : (Jalgaon) आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील अवैध धंदे, मद्य विक्रीबाबत अधिवेशनात ‘लक्षवेधी’ मांडली. पोलिसांनी (Police) मुक्ताईनगर तालुक्यातून अवैध धंदे (Crime) करणाऱ्यांना पकडून आणले. त्यावर पोलिसांना श्री. खडसे यांनी तत्काळ फोन करून, ‘तुम्ही आमच्या माणसांना पकडले आहे’. असा आरोप भाजप नेते, मंत्री गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी केला. (Eknath Khadse plays doel standards on illegal business)

Girish Mahajan & Eknath Khadse
Nandurbar News; आम्ही पण महाराष्ट्रातच राहतो ना?

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आदर्श ग्रामसेवक पुरस्कार वितरणानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मंत्री महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गिरीश महाजन यांच्यातील राजकीय वादाला नवी फोडणी देण्याचा प्रयत्न झाला.

Girish Mahajan & Eknath Khadse
Sharad Pawar News : पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत!

यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांना टोला लगावला. ते म्हणाले, त्यांच्यावर दबाब टाकला. म्हणजे एकीकडे अवैध धंद्यावरून लक्षवेधी मांडायची आणि पोलिसांनी कारवाई केली, की त्यांना फोनवरून धमकी द्यायची, हा कोणता प्रकार आहे? हे कसले लोकप्रतिनिधी आहेत. खडसे यांचे पितळ उघडे पडले आहे.

कापसाच्या दराबाबत मंत्री महाजन म्हणाले, की कापसाला दर खरोखरच कमी मिळत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर कापसाचा दर ठरतो. शेतकऱ्यांना भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला मागणी नाही.

Girish Mahajan & Eknath Khadse
Nashik News; महिंद्रा इलेक्ट्रिकल प्रकल्पावरून भाजपसह शिंदे गटाची होणार कोंडी

राज्य शासन अधिवेशन काळात कापसाच्या दराबाबत सकारात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करेल. सिलिंडर व इतर बाबींचा दरही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर अवलंबून असतात. कसब्यातील पोटनिवडणुकीत पराजयाबाबत मंत्री महाजन म्हणाले, की निसटता विजय मिळाला, म्हणून मोठा विजय मिळाला, असे नाही.

‘काय होताय तू... काय झालास तू’?

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाविषयी मंत्री महाजन म्हणाले, की शिवसेनेची गत आता ‘काय होतास तू... काय झालास तू?’, अशी झाली आहे. शिवसेना पक्ष गेला, चिन्ह गेले. यामुळे ठाकरे काहीही बोलताहेत. जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हा कोरोनाचे कारण सांगून घरात बसून होते. तेव्हा महागाई दिसली नाही.

Girish Mahajan & Eknath Khadse
Nashik News; `कसबा` विजयाने शिवसेना काँग्रेसच्या दारात!

आता महागाईविरोधात ओरडत फिरताहेत. ते ‘वाचाळवीर’ आहेत. त्यांना शिवसेनेने पक्षातून ढकले आहे. आता शिवसेना शिंदे गटाची आहे. चिन्हही त्यांना मिळाले आहे. ४० आमदार त्यांना सोडून गेले. त्यांना शिवसेनेतून काढून टाकले आहे. यामुळे त्यांचा तोल यापुढील काळात अजून सुटेल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com