Sharad Pawar News : पवारांनी वाढवले भाजपचे टेन्शन; बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत!

Ncp News : केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप येण्याची शक्यता नाही. तसेच अंद्रप्रदेश, हैद्राबाद, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप नाही.
Sharad Pawar News
Sharad Pawar NewsSarkarnama

Baramati News : केरळ, तामिळनाडूमध्ये भाजप येण्याची शक्यता नाही. तसेच अंद्रप्रदेश, हैद्राबाद, पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशमध्ये भाजप नाही. आपल्याकडे शिक्षक-पदवीदर निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्था आणि आता पार पडलेल्या पुणे व पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकीचे निकाल पहाता बदलाचे वारे वेगाने वाहू लागले आहेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले.

बारामती (Baramati)-गोविंदबाग येथील आपल्या निवासस्थानी पवार पत्रकारांशी बोलत होते. महाराष्ट्रात पोटनिवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मिळत असलेले यश, राष्ट्रवादी (NCP) पक्षाच्या नागालॅंडमध्ये निवडून आलेल्या ८ जागा, निवडणूक आयोगाबाबात सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, कांद्याचे पडलेले भाव आदी विविध मुद्यांच्या आधारे पवार यांनी यावेळी भाजप सरकारकाला धारेवर धरले.

Sharad Pawar News
Mumbai News : ठाकरेंना रोखण्यासाठी भाजप-शिवसेनेचा नवा प्लॅन; देणार जशास तसे उत्तर

या वेळी पवार म्हणाले, अत्ताच ठोस निषर्कश काढणे योग्य नाही, परंतू आगामी निवडणुकांमध्येही बदल आणखी प्रखरशाने बघायला मिळेल अशी मला खात्री वाटते, अशा शब्दांत पवार यांनी राजकीय अंदाज वर्तविला.

''भाजप पक्षाचा पोटनिवडणुकीत पाडाव झाला असे विचारले असता पवार म्हणाले, ''मला वाटते आता देशात बदलाचा सूर तयार होत आहे. पुण्याची निवडणूक काय सांगते, स्थानिक स्वरांज्य संस्था, शिक्षक-पदविधर निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये भाजपला एक दोन जागा सोडल्या तर इतर ठिकाणी त्यांना समाधानकारक यश मिळाले नाही.

वास्तविक सरकार त्यांचे आहे. सत्तेचा पुर्ण वापर केला, हे जगजाहिर आहे. कसबा कोणाचा होता आणि तेथील लोकांनी काय निर्णय घेतला. त्या पार्श्वश्वभूमिवर जनतेची भूमिका बदलाला अनुकूल आहे. एकूण निषकर्श काढणे योग्य नाही. पण देशातला ट्रेन बघितले तर केरळ, तामिळनाडूमध्ये आज भाजप नाही आणि या दोन्ही ठिकाणी येण्याची शक्यता नाही. कर्नाटकमध्ये पुर्वी काँग्रेसचे राज्य होते. खासदार व आमदार फोडूननंतर भाजपचे राज्य तेथे आले.

आंद्रप्रदेश आणि हौद्राबाद या दोन्ही ठिकाणी बघितले तर भाजप त्या ठिकाणी नाही. तशीच स्थिती पंजाब, दिल्ली, हिमाचल प्रदेशात आहे. त्यामुळे आगामी निवडणुकांमघ्ये बदल अपेक्षित आहे. ''निवडणूक आयोगाबाबतच्या शंका आमच्या काही सहकारऱ्यांनी निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाबाबत निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये सर्वोच्च न्यायालयाने बदल केला. नियुक्ती करताना सरन्यायाधीश, प्रधानमंत्री आणि मुख्य म्हणजे विरोधी पक्ष नेताही त्या प्रक्रियेत आले आहेत. त्यामुळे हा निर्णय लोकशाहीच्या दृष्टीने अतिषय चांगला झाला आहे, असे सांगत पवार यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले.

Sharad Pawar News
Kapil Sibal News : केंद्र सरकारच्या विरोधात कपिल सिब्बल मैदानात; केली मोठी घोषणा

कांद्याच्या प्रश्नाबाबत पवारांची नाराजी...

शिंदे-फडणविस सरकार कांद्याचा प्रश्न सोडविण्यात कमी पडले आहे. शेतकऱ्यांना अपेक्षित भाव मिळत नसल्याने कांदा फेकून देत आहेत. या वाईट परिस्थितीत सरकार निर्णय घेत नाही. आम्ही लोक सरकारमध्ये असताना कांद्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, आम्ही त्यातून मार्ग काढत होतो. आम्ही कांदा खरेदी केला. नाफेडला खरेदी करायला लावला. मोठा अर्थिक बोजा आम्ही उचलाल. पण शिंदे-फडणविस सरकार अद्याप काहीही करत नाही, असे सांगत पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com