BJP Maharashtra Politics: पक्षविरोधी कारवाया केल्याने सुधाकर बडसौम्य गुजर यांची उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेतून हकालपट्टी केली. याच बडगुजर यांच्या स्वागतासाठी भारतीय जनता पक्ष आतुर असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत त्यांचा प्रवेश होण्याची दाट शक्यता आहे.
शिवसेनेचे बडतर्फ नेते सुधाकर बडगुजर यांचा भाजप प्रवेश जवळपास निश्चित झाला आहे. गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्याविषयी सौम्य भूमिका घेतली होती. श्री. बडगुजर यांच्यावरील आरोपांबाबत देखील बावनकुळे यांनी सौम्य भूमिका घेतली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बडगुजर यांचा प्रवेश होणार असल्याचे बोलले जाते.
आगामी नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने निवडून येण्याची क्षमता हा एकमेव निकष गृहीत धरला आहे. या पार्श्वभूमीवर पक्ष मुक्तपणे प्रवेश देण्याची भूमिका घेत आहे. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर त्याबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बडगुजर यांचे स्वागत करण्यास भाजप उत्सुक आहे.
श्री बडगुजर आणि स्थानिक भाजप आमदार सीमा हिरे त्यांसह सिडकोतील भाजप नगरसेवक यांच्यात मोठा राजकीय वाद आहे. व्यक्तिगत आरोपांपासून तर शारीरिक हल्ले आणि मारामाऱ्या इथपर्यंत तो वाढला आहे. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते बडगुजर यांच्या प्रवेशाला विरोध करीत आहेत.
या संदर्भात आमदार सीमा हिरे यांनी जाहीरपणे बडगुजर यांच्यावर आरोप केले आहेत. विधानसभा निवडणुकीत बडगुजर यांनी भाजप कार्यकर्त्यांवर हल्ले करणे आणि त्यांना दहशत निर्माण करून धमकावणे असे अनेक आरोप केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांना प्रवेश दिल्यास महापालिका निवडणुकीत भाजपला फटका बसण्याची शक्यता असल्याचे हिरे यांनी म्हटले आहे.
मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी सलीम कुत्ता यांच्यासोबत नृत्य केल्याने सुधाकर बडगुजर यांचे फोटो थेट विधिमंडळात झळकविण्यात आले होते. भाजपने या विषयावर प्रचंड गदारोळ केला होता. याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून भाजपने बडगुजर यांना सळो की पळो करून सोडले होते.
या सर्व राजकीय वादाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते जलसंपदा मंत्री महाजन हे मात्र श्री. बडगुजर यांना पक्षात घेण्यास ठाम आहेत. त्याबद्दल सातत्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. भाजपला निवडणुका जिंकण्यासाठी अन्य पक्षातील फोडाफोडी अद्यापही आवश्यक वाटत आहे. त्यामुळे श्री. बडगुजर यांचा प्रवेश हा राजकीय दृष्ट्या चर्चेचा विषय ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.