Shivsena MNS Alliance Proposal : ठाकरे बंधूंच्या युतीसाठी अद्वय हिरेंचा 'मातोश्री'वर थेट प्रस्ताव...

Advay Hire Meets Uddhav Thackeray in Mumbai Over Shivsena-MNS Alliance Proposal : नाशिक मालेगावमधील शिवसेनेचे उपनेता अद्वय हिरे यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Advay Hire
Advay HireSarkarnama
Published on
Updated on

Advay Hire Uddhav Thackeray Meeting : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीची नातेवाईकांमार्फत चर्चा सुरू असताना, नाशिक मालेगावमधील शिवसेनेचे उपनेता अद्वय हिरे यांनी मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन युतीचा ठोस प्रस्ताव मांडल्याची बातमी समोर आली आहे.

यामुळे शिवसेना ठाकरे आणि मनसेच्या युतीच्या अंतर्गत चर्चांना अधिक बळ मिळालं आहे. उद्धव ठाकरे यांनी अद्वय हिरे यांनी मांडलेल्या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंच्या युतीबाबत सध्या राज्यात चर्चा आहे. या युतींच्या चर्चांवर महायुतीकडून (Mahayuti) सावध प्रतिक्रिया दिली जात आहे. महाविकास आघाडीने या युतीचे स्वागत केले आहे. ठाकरे बंधू देखील या युतीवर सूचक असं विधान करत आहे.

दोन्ही बाजूच्या कार्यकर्ते देखील या युतीवर सकारात्मक आहे. दोन्ही बाजूने सावध अशी विधानं केली जात आहे. यातच मालेगावमधील शिवसेना उपनेता अद्वय हिरे यांनी मुंबईत उद्धव ठाकरेंची भेट घेऊन युतीचा प्रस्ताव मांडला आहे.

या संभाव्य युतीमुळे दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. शिवसेना आणि मनसे (MNS) ही दोन्ही बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा जपणारी आणि मराठी अस्मितेसाठी लढणारी राजकीय शक्ती आहेत. या दोन पक्षांची युती झाली, तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलतील, आणि युतीच्या चर्चांनी तसे संकेत मिळू लागलेत.

Advay Hire
Chandrakant Khaire-Ambadas Danve : खैरे-दानवे हातात हात घेऊन नाचले; शिवसेनेच्या वर्धापनदिनात दोन नेत्यांचे मनोमिलन!

विशेषतः मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर यांसारख्या शहरी भागांत मराठी मतदारांमध्ये या युतीला पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. दोन्ही पक्षांकडे सक्षम नेतृत्व, अनुभवी कार्यकर्ते आणि जनतेशी नाळ जोडलेली राजकीय भूमिका आहे.

Advay Hire
Prakash Mahajan Vs Rane: 'दीड दमडी' उल्लेख करत नारायण राणेंची धमकी,प्रकाश महाजनांचाही करारा जवाब; म्हणाले, 'मीही महाजन...'

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये या युतीचा प्रभावी परिणाम दिसून येईल. विशेषतः सत्ताधाऱ्यांना कडवे आव्हान देण्याची ताकद या युतीत असेल.

त्यामुळे राज्याच्या राजकारणात एक नवा अध्याय सुरू होऊ शकेल, असे मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांची अद्वय हिरे यांनी भेट घेताना खासदार संजय राऊत, रावळगावचे माजी सरपंच अशोक आखाडे, सुरेश पवार चर्चेत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com