Girish Mahajan politics: नाशिकमध्ये रंगतेय चर्चा...जिल्ह्याचा पालकमंत्री दत्तक की स्थानिक!

Girish Mahajan; Girish Mahajan or Manikrao kokate will be the guardian minister-नाशिकच्या पालकमंत्री पदी भाजपचे नेते गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची चर्चा आहे.
Devendra Fadanvis, Eknath Shinde & Ajit Pawar
Devendra Fadanvis, Eknath Shinde & Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Manikrao Kokate News: बीडच्या प्रकरणाने पालकमंत्री नियुक्तीचे निर्णय रखडले आहेत. याबाबत प्रभावी बहुमत असूनही महायुतीला निर्णय घेता आलेलं नाही. त्यामुळे जिल्ह्यात पालक मंत्री कोण याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे.

नाशिक जिल्ह्यात १५ पैकी १४ आमदार महायुतीचे आहेत. सर्वाधीक ७ आमदार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षाचे आहेत. विरोधी पक्षाचा एकही आमदार जिल्ह्यात नाही. त्यामुळे महायुतीला निर्णय घेण्यासाठी पूर्ण अनुकूलता आहे. तरीही पालकमंत्री पदाचा निर्णय होऊ शकलेला नाही, हा कार्यकर्त्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.

Devendra Fadanvis, Eknath Shinde & Ajit Pawar
Shivsena Eknath Shinde: उत्साह वाढलेली शिंदेंची शिवसेना म्हणते, ठाकरे समर्थकांना ‘नो एन्ट्री’

जिल्ह्यात सध्या सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याचा विचार होईल, असे मानले जाते. भाजपचे नेते गिरीश महाजन हे देखील दावेदार आहेत. त्या दृष्टीने कार्यकर्ते आणि पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहेत. याबाबतचा निर्णय केव्हा होणार याविषयी तर्क वितर्क केले जात आहेत.

Devendra Fadanvis, Eknath Shinde & Ajit Pawar
Congress politics: ‘या’ मतदारसंघात राजीनामा दिलेले ६५ पदाधिकारीच करणार काँग्रेसची पुर्नबांधणी...

नाशिक जिल्ह्यात भाजपचे पाच आमदार आहेत मात्र कोणालाही मंत्री पदासाठी संधी मिळालेली नाही. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री म्हणून या पदाला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे भाजपने आग्रह धरल्यास जळगावचे गिरीश महाजन यांची पुन्हा एकदा नाशिकच्या पालकमंत्री पदी नियुक्ती होऊ शकते.

अशा स्थितीत स्थानिक आमदार मात्र दत्तक पालकमंत्री ऐवजी स्थानिक हवा यासाठी आग्रही आहेत. यापूर्वी शिवसेना शिंदे पक्षाचे दादा भुसे पालकमंत्री होते. यंदाही ते पालकमंत्री पदासाठी इच्छुक आहेत. गिरीश महाजन यापूर्वी पालकमंत्री होते. सध्या छगन भुजबळ यांना मंत्रीपदाची संधी मिळालेली नाही.

दुसरीकडे नरहरी झिरवाळ यांनी कोणताही आग्रह धरलेला नाही. अशा स्थितीत कृषीमंत्री माणिकराव कोकाटे स्थानिक या मुद्द्यावर पालकमंत्री होणार का? हा चर्चेचा विषय आहे. यंदाच्या पंचवार्षिकला पालकमंत्री दत्तक की स्थानिक याला विशेष महत्त्व दिले जात आहे. जिल्ह्याच्या प्रशासकीय आणि राजकीय व्यवस्थेवर नियंत्रणासाठी तिन्ही पक्षांकडून पालकमंत्री आपलाच असावा, असा आग्रह धरला जात आहे.

मात्र बीड मधील प्रकरणाने राज्यातील वातावरण तापले आहे. अशा स्थितीत पालकमंत्री पदाची घोषणाही लांबली आहे. जिल्ह्यात प्रदीर्घकाळ छगन भुजबळ हे मंत्री आणि पालकमंत्री राहिले आहेत. यंदा पहिल्यांदाच भुजबळ यांच्या ऐवजी नव्या मंत्र्यांना संधी मिळाली. या मंत्र्यांच्या समर्थकांच्या अपेक्षा आणि आकांक्षा त्यामुळे वाढल्या आहेत. अशा स्थितीत पालकमंत्री आपलाच असावा, ही अशी अपेक्षा निर्माण झाल्यास नवल नाही.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com