Girish Mahajan News: जळगावच्या तिन्ही मंत्र्यांवर राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला `हा` गंभीर आक्षेप

Girish Mahajan, Gulabrao Patil politics, NCP criticized Jalgaon ministers on politics-गिरीश महाजन, गुलाबराव पाटील आणि अनिल पाटील या मंत्र्यांच्या दबावाखाली अधिकारी आणि प्रशासन काम करीत असल्याचा आरोप.
Minister Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil
Minister Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil PatilSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री डॉ सतीश पाटील यांनी महायुतीच्या मंत्र्यांवर गंभीर आक्षेप घेतले आहेत. जळगाव जिल्ह्यातील तिन्ही मंत्री अधिकाऱ्यांवर दबाव टाकतात. त्यामुळे विरोधी पक्षांच्या सरपंच व सदस्यांवर राजकीय दडपण येते, असा दावा त्यांनी केला.

विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचे राजकीय पडसाद जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात उमटत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि जळगावचे माजी मंत्री डॉ पाटील यांनी याबाबत सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले आहेत.

जळगाव जिल्ह्यात भाजपचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आपत्ती निवारण मंत्री अनिल पाटील आहेत. हे मंत्री अधिकाऱ्यांवर दबाव आणतात, अशी टिका त्यांनी केली.

ग्रामपंचायत सदस्यांवर राजकीय दडपण आणतात. आमच्या पक्षात या, अन्यथा अपात्र होण्यासाठी तयार रहा, अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य दडपणाखाली आहेत, असा गंभीर आक्षेप डॉ. पाटील यांनी घेतले आहेत.

Minister Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil
Dr Shobha Bacchav: महापालिकेने कचराही सोडला नाही, थेट दुप्पट दराने काढली निविदा!

डॉ पाटील म्हणाले, नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा पराभव झाला. या पराभवाची कारणे आम्ही शोधली आहेत. त्यावर उपाययोजना केली जाईल असा दावा त्यांनी केला.

भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी महिला बचत गटाच्या सदस्यांवर दडपण आणले. या महिला सदस्यांना आमिष दाखवले. त्यामुळे मतदान केंद्रावर त्याचा प्रभाव पडला. अशाच प्रकारे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवरही दबाव आणला जात आहेत.

विरोधी पक्षाची सत्ता असलेल्या गावांमध्ये सरपंच आणि सदस्य दडपणाखाली आहेत. या पदाधिकाऱ्यांना सतत त्रास दिला जातो. जिल्हा प्रशासन देखील त्याप्रमाणे काम करते. सतत तसा इशारा मंत्री आणि त्यांचे कार्यकर्ते देतात. या धमक्यांना ग्रामपंचायत स्तरावरील कार्यकर्ते व पदाधिकारी बळी पडतात.

Minister Girish Mahajan, Gulabrao Patil & Anil Patil
Saroj Ahire Politics: मटणाचा झणझणीत रस्सा आमदार सरोज अहिरेंच्या मेंदूला मुंग्या आणणार!

प्रशासन देखील या मंत्र्यांच्या दबावाखाली विरोधी पक्षांचा सदस्यांच्या विरोधात निकाल देतात. ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत राज्यात सत्तांतर होईल. महाविकास आघाडीची सत्ता येईल. त्यानंतर अशा प्रकारे राजकीय हेतूने आणि सूडबुद्धीने काम करणाऱ्या लोकांना योग्य धडा शिकविला जाईल. असा इशारा देखील डॉ पाटील यांनी दिला.

यावेळी नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष प्रमोद पाटील, माजी मंत्री गुलाबराव देशमुख, माजी आमदार राजीव देशमुख, शहर अध्यक्ष एजाज मलिक, अरुण पाटील यांचं विविध पदाधिकारी उपस्थित होते

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com