Saroj Ahire Politics: मटणाचा झणझणीत रस्सा आमदार सरोज अहिरेंच्या मेंदूला मुंग्या आणणार!

Saroj Ahire politics, MLA Ahire gave a feast of mutton, Varkari angree- हरिनाम सप्ताह सुरू असलेल्या माडसांगवीत वारकरी संतापले, हरिनाम सप्ताहाच्या माडसांगवीत आमदार सरोजअहीरेंची निवडणुकीसाठी मटणाची मेजवानी
MLA Saroj Ahire, NCP.
MLA Saroj Ahire, NCP.Sarkarnama
Published on
Updated on

Saroj Ahire news: सध्या सर्वच आमदार निवडणुकीची तयारी करीत आहेत. त्यासाठी रंगीत, संगीत मेजवान्या नवीन नाहीत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे एका वेगळ्याच वादात सापडल्या आहेत. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांचा दौरा झाला. यावेळी आमदार अहिरे यांनी माडसांगवी येथे कार्यक्रम ठेवला. या कार्यक्रमात त्यांनी शेकडो उपस्थित त्यांना मांसाहारी भोजन दिले.

या पंगतीसाठी बोकडांचा बळी देण्यात आला. मात्र हा कार्यक्रम वेगळ्याच कारणाने गाजतो आहे. वारकरी संप्रदायाच्या अनुयायांच्या या गावात या मांसाहारी भोजनाच्या पंगतीने गावकरी व्यथित झाले आहेत. सबंध मतदारसंघात तो चर्चेचा विषय ठरला आहे.

मटणाचा झणझणीत रस्सा आमदार सरोज अहिरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरला आहे. माडसांगवी येथे सध्या वारकरी नाम सप्ताह सुरू आहे. वारकरी आणि शेतकरी मनोभावे भजन कीर्तनाच्या या कार्यक्रमात दंग असतात. याचवेळी आमदार अहिरे यांनी निवडणुकीचे शक्ती प्रदर्शन केले.

या कार्यक्रमात काही कमी पडायला नको म्हणून गावातील मंगल कार्यालयात भव्य दिव्य मंडप उभारला होता. कार्यकर्त्यांची मने जिंकण्यासाठी मांसाहारी बेत आखण्यात आला. त्यासाठी ग्रामस्थांनाही पाचारण करण्यात आले. आता हा मांसाहारी बेत अहिरेंच्या अंगलट येत आहे.

MLA Saroj Ahire, NCP.
Congress Politics: 'झेडपी'चे राजकारण विधानसभेत केले, अन् आमदार खोसकर कायमचे बाद झाले!

हे ग्रामस्थ भोजनासाठी गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. यावेळी संतप्त ग्रामस्थांनी आमदार अहिरे यांना चांगलेच खडे बोल सुनावले. वारकरी शाकाहारी असतात. त्यांना मांसाहारी जेवणाला निमंत्रित करणे योग्य आहे का? असे काही ग्रामस्थांनी विचारले.

या वादाला राजकीय पार्श्वभूमी देखील अशीच आहे. आमदार अहिरे यांना गेल्या निवडणुकीत नागरिकांनी आर्थिक मदत केली होती. वर्गणी काढून त्यांना अर्थसहाय्य करण्यात आले. पैशांबरोबरच मतांची ही मदत केली.

शिवसेनेचे आमदार बबन घोलप या मतदारसंघात प्रदीर्घ काळ आमदार होते. त्यामुळे अँटी इन्कमबन्सी त्याला कारणीभूत होती. मात्र ज्यांना गेल्या निवडणुकीत वर्गणी काढून निवडून दिले, त्यांनी आता त्याच गावकऱ्यांना मटणाच्या पार्ट्या देण्यास सुरूवात केली.त्यामुळे वारकरी नाराज आहेत.

MLA Saroj Ahire, NCP.
Ajit Pawar : अजित पवारांच्या दौऱ्याआधीच उदय सांगळे यांनी जाहीर केली उमेदवारी

सध्या देवळाली मतदारसंघात अनेक उमेदवार तयारीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लक्ष्मण मंडाले विविध सप्ताह आणि मंदिरांच्या कार्यक्रमांना मदत करतात. माजी आमदार योगेश घोलप लोकांमध्ये जाऊन कार्यक्रमांना हजेरी लावतात. भाजपच्या राजश्री अहिरे रेशन कार्ड वाटपाची मोहीम करीत आहेत.

देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड उपाध्यक्ष प्रीतम आढाव यांचाही युवकांना खेळाचे साहित्य देऊन मदतीचा प्रयत्न असतो. प्रत्येक इच्छुक मतदारांची मने जिंकण्यासाठी त्यांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.

यामध्ये शरद पवार यांच्या मानसकन्या म्हणून आमदार अहिरे सांगत होत्या. प्रत्यक्षात त्यांनी पक्षात बंडखोरी झाल्यावर अजित पवार गटात प्रवेश केला. त्यामुळे त्या सत्तेच्या राजकारणात चार पावले पुढे निघाल्या. त्यांनी चक्क वारकऱ्यांचा नाम सप्ताह सुरू असलेल्या गावात मांसाहारी पंगतच भरवली.

MLA Saroj Ahire, NCP.
Vijaya Rahatkar : विजया रहाटकरांनी भाजप प्रचाराचं स्लोगन सांगितलं; तयारी करा आणि घराघरापर्यंत जा...

यासंदर्भात आमदार अहिरे यांनी मांसाहरी जेवणाचे समर्थन केले. त्या म्हणाल्या, विरोधकांना विरोधकांचे काम करू द्या. मी विकासाचे काम करीन. माझ्या कार्यक्रमात सहा हजार लोक भरपेट जेऊन गेले. जे नाक मुरडतात, त्यांनीही मटनाचे जेवण केले आहे. त्यामुळे त्याची फार पर्वा करीत नाही.

माडसांगवीतील काही वारकरी या प्रकाराने नाराज झाले आहेत. हा बोकड बळी आमदार अहिरे यांना निवडणुकीत मदतीला येणार की अडचणीचा ठरणारहोणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

यासंदर्भात ज्येष्ठ वारकरी आणि कार्यकर्ते लहानू पेखळे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, गावात नाम सप्ताह सुरू आहे. अशावेळी ज्या आमदारांना आम्ही वर्गणी काढून निवडून दिले, त्यांनी किमान वारकरी संप्रदायाचा तरी आदर ठेवायला हवा होता. राजकीय नेत्यांनी संस्कृतीचा किती ऱ्हास केला, याचे हे उदाहरण म्हणता येईल. आमच्या गावात हा प्रकार घडल्याने मी आमदारांना याबाबत खडे बोल सुनावले आहेत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com