Girish Mahajan Politics: गुन्हेगारांना पक्षातून काढणार का? या प्रश्नावर गिरीश महाजन यांचे कानावर हात!

Girish Mahajan reaction on party criminals: नाशिकच्या पोलिस आयुक्तांना थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर गुन्हेगारांवर कारवाईच्या सूचना दिल्याने परिणाम दिसला
Girish-Mahajan
Girish-MahajanSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan Reaction: नाशिक शहरात गेल्या सहा महिन्यात गुन्हेगारीने धक्कादायक डोके वर काढले आहे. शहरात ४६ हुन अधिक खून झाले आहेत. त्यामुळे आता पोलीस चांगलेच सक्रिय झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी परखड मत व्यक्त केले. गुन्हेगार कोणत्याही राजकीय पक्षाचा असला तरी त्याला सोडले जाणार नाही. गुन्हेगारी मोडून काढण्याच्या सूचना पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या उद्धव निमसे आणि बाळासाहेब पाटील या दोन नगरसेवकांवर खुनाचे गुन्हे दाखल आहेत. नुकतेच भाजपामध्ये प्रवेश केलेल्या अजय बागुल आणि मामा राजवाडे यांच्या विरोधात गोळीबाराच्या गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Girish-Mahajan
BJP Politics: भाजपच्या 'एकला चलो रे' वर आज मंथन, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाची अस्वस्थता दूर होणार का?

मंत्री महाजन या संदर्भात म्हणाले, गेल्या काही दिवसात नाशिक शहरातील गुन्हेगारांना माज आला होता. रात्री बे रात्री गोळीबार आणि खुणासारखे प्रकार घडत होते. गुंडगिरीने डोके वर काढले होते. आता ही गुन्हेगारी मोडून काढण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.

Girish-Mahajan
Nashik Crime: भाजपचे डॅमेज कंट्रोल; प्रकाश लोंढे यांच्या विरोधात दोन कोटींच्या खंडणीचा नवा गुन्हा, राजकीय अस्तित्व संकटात?

याप्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांनीच पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या. त्यानंतर शहरातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. कारवाईबाबत सूचना दिल्याने त्याचे परिणाम दिसून आले.

शेती आणि बंगले बळकावण्याचे काम कोणी गुन्हेगार करत असेल तर, त्याला अद्दल घडवू. गुंड लोकांच्या जमिनी बळकावतात. या गुंडगिरीमुळे लोकांच्या अंगावर कपडे देखील राहिले नाही, अशी स्थिती आहे. शहरातील गुन्हेगारीचे हे विदारक चित्र दस्तूरखुद्द मंत्री महाजन यांनीच अतिशय आक्रमक होत मांडले.

भाजप आणि अन्य राजकीय नेत्यांवरील कारवाईमुळे शहरातील राजकीय गुन्हेगारी चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर भाजप पक्षातील गुन्हेगारांवर काय कारवाई करणार? भारतीय जनता पक्ष या गुन्हेगारांची पक्षातून हकालपट्टी करणार का? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला.

गुन्हेगारांच्या पक्षातून हकलपट्टीचा प्रश्न जलसंपदा मंत्री महाजन यांनी शिताफीने टाळला. वारंवार विचारणा केल्यावर या प्रश्नावर मी निर्णय घेऊ शकत नाही. पक्षाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ नेते यावर बोलतील, असे सांगत मंत्री महाजन यांनी या गुन्हेगारांच्या पक्षातून हाकालपट्टीच्या प्रश्नावर कानावर हात ठेवले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com