Girish Mahajan News : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने लगतच्या राज्यातील विविध पदाधिकारी, मंत्री आणि कार्यकर्त्यांना प्रचारात उतरवले होते. त्यात बेळगाव परिसरातील मराठी बहुल अठरा मतदारसंघांपैकी गिरीश महाजन यांना दहा व जयकुमार रावल यांच्याकडे आठ मतदारसंघ होते. (BJP given responsiblity of 18 Assembly seats to Minister Girish Mahajan & Jaykumar Rawal)
कर्नाटक (Karnataka) विधानसभा निवडणुकीत (Election) बेळगावच्या मराठी बहुल मतदारसंघांचा प्रचार भाजपने (BJP) गिरीष महाजन (Girish Mahajan) आणि जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांच्यावर सोपवला होता. त्यात त्यांना यश आले नाही.
या निवडणुकीत नाशिकचे जगदीश पाटील यांनी वीस दिवस प्रचार केला. त्यांच्याकडे उत्तर बेळगाव हा मतदारसंघ होता. तेथील विद्यमान आमदार तसेच शहराध्यक्ष अनिल बेनके यांची उमेदवारी यंदा बदलण्यात आली. त्यामुळे संघटनात्मक पातळीवर गोंधळाचे वातावरण होते. त्यात परिश्रमपुर्वत समन्वय निर्माण केला. यंदा भाजपसाठी हा मतदारसंघ वीस हजार मतांनी मायनस असल्याचा सर्व्हे होता. त्यामुळे भाजपने लिंगायत असलेले डॉक्टर रवी पाटील यांना उमेदवारी दिली. येथे पक्षाचा सुमारे साडे चार हजार मतांनी पराभव झाला.
भारतीय जनता पक्षाच्या या प्रचारात जळगाव, जामनेर, नाशिक, धुळे येथील शंभरहून अधिक पदाधिकारी गेले होते. त्यातील बहुतांशी दोन ते तीन दिवस प्रचारात सहभागी झाले. त्यात आमदार राहुल ढिकले, माजी गटनेते जगदीश पाटील, स्थायी समितीचे माजी सभापती गमेश गिते, माजी नगरसेवक कमलेश बोडके, मुकेश शहाणे, राकेश ढोमसे, रमेश गिते आदी प्रमुख होते. भाजपने दोन स्तरावर निवडणूक सर्व्हेक्षण केले होते. त्यातील निष्कर्ष आमलात आणले. परंतु अंतिम निकाल पक्षाला अपेक्षित असा मिळाला नाही. त्यामुळे हे परिश्रम वाया गेले.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.