Ajit Pawar News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे मतदारसंघातील विरोधक आमदार नरेंद्र आणि किशोर दराडे यांच्यातून सध्या विस्तवही जात नाही. मात्र दराडे बंधूंच्या कौटुंबिक विवाह सोहळ्यास राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चक्क दोन तास हजेरी लावली. त्यामुळे भुजबळ विरोधकांच्या दारी अजित पवारांची हजेरी हा चर्चेचा विषय ठरला आहे. (MLC Kishor Darade`s son marriage ceremony attent by political leaders)
राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी सहकुटुंब शिवसेनेचे (Shivsena) (उद्धव ठाकरे) (Uddhav Thackeray) आमदार किशोर दराडे (Kishor Darade) यांच्या मुलाच्या विवाहाला हजेरी लावली. या सोहळ्याला मुख्यमंत्र्यांसह विविध नेत्यांनी हजेरी लावली. त्यामुळे हा विवाह राजकीय नेत्यांच्या भवुया उंचावल्या आहेत.
दोन बंधू आमदार असलेल्या कुटुंबातील विवाह सोहळ्यास शिवसेना शिंदे गट तसेच ठाकरे गट, राष्ट्रवादी, भाजप या प्रमुख पक्षांच्या प्रमुख नेत्यांची हजेरी जिल्ह्यात चर्चेची ठरली आहे. या मागे राजकीय बीजे देखील रुजले नसेल तर नवलच..! दराडेच्या राजकीय भूमिकेकडे डोळा ठेवत या नेत्यांनी केलेली बॅटिंग अन टाकलेली गुगली आगामी राजकीय गणितांची नांदी ठरेल हे नक्की.!
नाशिकच्या राजकारणात आणि विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे महत्त्वाचे स्थान आहे. मात्र त्यांच्या येवला मतदारसंघात शिवसेना हा त्यांचा प्रमुख विरोधक आहेत. नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. त्यात शिवसेनेचे संभाजी पवार भुजबळांसमवेत आले. मात्र आमदार दराडे यांना भुजबळ यांनी एकटे पाडले. त्यामुळे आता भुजबळ विरूद्ध दराडे असे चित्र आहे.
भुजबळ यांच्या विरोधकांना अजित पवार शक्ती देण्याचा प्रयत्न करतात, असा आरोप केला जातो. या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी मुलगा पार्थ यांसह दराडे यांच्याकडे हजेरी लावली. यावेळे ते निवांत होते. त्यांनी विविध विषयांवर गप्पा मारल्या. अर्थातच त्यावरून राजकीय चर्चा सुरु झाली आहे.
अजितदादांच्या दिलखुलास गप्पा!
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे दुपारी दोन तास विवाह सोहळ्यानिमित्ताने उपस्थित होते. दराडे कुटुंबीयांसोबत फोटोसेशन, भोजन व गप्पाही केल्या. विशेष म्हणजे मी इतक्या लांबून आलो..मला गिफ्ट काय देणार! असा सवाल करून त्यांनी सर्वांनाच कोड्यातही टाकले हे नक्की! माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी विवाह सोहळ्यात हजेरी लावत, मामा खूप लग्न होते तरी मी तुमच्यासाठी आवर्जून आलो..असे म्हणत त्यांनीही दराडेंवरील प्रेम व्यक्त केले. आमदार माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, नितीन पवार, हिरामण खोसकर या राष्ट्रवादीच्या आमदारांचीही उपस्थिती होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.