Raut Vs Mahajan Politics: संजय राऊत यांच्या बाणाने एका दगडात दोन पक्षी, गिरीश महाजन अडकले त्यांच्याच जाळ्यात?

Girish Mahajan Stuck in Raut’s Strategic Political Net : गिरीश महाजन यांनी सुनील बागुल यांच्याबाबत रचलेला डाव उलटला, सुनील बागुल यांचा प्रवेश थांबवण्याची नामुष्की.
Sanjay Raut, Sunil Bagul & Girish Mahajan
Sanjay Raut, Sunil Bagul & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Sunil Bagul News: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या बड्या नेत्यांना जाळ्यात अडकवण्यासाठी टाकलेला डाव भाजपच्याच अंगलट आला आहे. दोन दिवसांपूर्वी शिवसेनेच्या नेत्यांविरुद्ध पोलिसांनी अतिशय वेगाने आणि संशयास्पद हालचाली करीत दरोड्याचा गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा भाजपच्याच अडचणी वाढवणारा ठरला.

शहरातील कार्यकर्ते गजू घोडके यांनी दोन दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर एक व्हिडिओ प्रसारित केला होता. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे उपनेते सुनील बागुल यांच्याबाबत त्यात गंभीर आरोप करण्यात आले होते. श्री बागुल यांच्या विरोधात ईडीची कारवाई करण्यात यावी. त्यांचे सर्वच व्यवहार संशयास्पद असल्याचा दावा घोडके यांनी केला होता.

श्री घोडके यांनी हा व्हिडिओ व्हायरल केल्यावर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते सुनील बागुल यांच्या समर्थक चांगलेच भडकले होते. यातील काही कार्यकर्त्यांनी घोडके यांना घरात घुसून बेदम मारहाण केली होती.

या विरोधात घोडके यांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गंमत म्हणजे त्यावर पोलिसांनी अतिशय गतीने कार्यवाही करीत संबंधितांची चौकशीही न करता दरोडा आणि अन्य गंभीर गुन्हे दाखल केले होते. त्यामध्ये श्री बागुल आणि राजवाडे दोघेही फरार असल्याचे दाखवण्यात आले.

Sanjay Raut, Sunil Bagul & Girish Mahajan
Uddhav Thackeray : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, संजय राऊत म्हणतात 'जमवा जमव पार्टीची कमाल'

भद्रकाली पोलिसांनी केलेली कारवाई राजकीय हेतूने प्रेरित होती असा आरोप शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्यांनी केला होता. याबाबत पक्षाचे नेते दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते, शंभू बागुल, महानगरप्रमुख मामा राजवाडे, जिल्हाप्रमुख डी. जे. सूर्यवंशी आदींनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. हा गुन्हा राजकीय नेत्यांच्या दबावातून दाखल करण्यात आला असल्याचा आरोप होता. त्यामुळे हा गुन्हा मागे घेण्याची मागणी करण्यात आली होती.

पोलीस आयुक्तांनी याबाबत कोणतीही कार्यवाही न करता संबंधित शिवसेना नेत्यांना फरारी दाखविले होते. याच फरार आरोपींचा आज मुंबईत मंत्री आणि पोलिसांच्या बंदोबस्ता भाजप प्रवेश कसा होऊ शकतो? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांनी उपस्थित केला होता. या आरोपाने भारतीय जनता पक्ष आणि विशेषतः जलसंपदा मंत्री गिरीश महाजन चांगलेच अडचणीत आले.

भारतीय जनता पक्षात फरारी आरोपी आणि वादग्रस्त नेत्यांना प्रवेश देण्याच्या घटना सामान्य बनले आहेत. यापूर्वी ही स्थानिक नेत्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी करू नये माझे नगरसेवक गणेश गीते यांचा आज प्रवेश होणार होता. आज मात्र शिवसेना उपनेते सुनील बागुल यांचा प्रवेश गिरीश महाजन यांची अडचण करणारा ठरला.

याबाबत शिवसेना नेते संजय राऊत यांनी मारलेला बाण भाजपच्या जिव्हारी लागला आहे. विशेष म्हणजे या बाणाने शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या पक्षांतर करणाऱ्या नेत्यांचे वस्त्रहरण झाले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित गुन्हे दाखल करण्यासाठी सूत्रे हलविण्याची चर्चा आहे. त्यामुळे शत्रूसाठी टाकलेल्या जाळ्यात मंत्री महाजन हेच अडकले, अशी स्थिती निर्माण झाली आहे.

यासंदर्भात मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याने भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आज होणारे नाशिकच्या नेत्यांचे प्रवेश थांबविले आहेत. यामध्ये भाजपचे माजी नगरसेवक गणेश गीते यांचा प्रवेशही पुन्हा एकदा रखडला आहे. गणेश गीते गेले सहा महिने भाजप प्रवेशासाठी प्रयत्नशील होते. तीन वेळा त्यांचा प्रवेश निश्चित होऊ नये रद्द झाला होता. आज पुन्हा एकदा त्यांना अपशकुन झाला आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती. विरोधी पक्षांची ही मागणी पोलिसांनी मान्य केली असती, तर काय? हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे मागणी मान्य झाली असती तर या पक्षालाच मोठा धक्का बसला असता आणि भाजपला लाभ झाला असता.

आज मात्र चक्र उलटे फिरले, या प्रवेशांवरून आज भाजपच अडचणीत सापडला आहे. मात्र यावरून बोध घेण्याची शक्यता कमीच दिसते आहे. आता सुनील बागुल आणि त्यांचे सहकारी पोलिसांना शरण जाणार का याची चर्चा सुरू आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com