Uddhav Thackeray : नाशिकमध्ये उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का, संजय राऊत म्हणतात 'जमवा जमव पार्टीची कमाल'

Uddhav Thackeray Faces Major Political Blow in Nashik: नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये भाजप उद्धव ठाकरे यांना आज आणखी मोठा धक्का देत आहे. त्यावरुन संजय राऊत संतापले आहेत.
Sanjay Raut | Uddhav Thackeray
Sanjay Raut | Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nashik Political News : पावसाळी अधिवेशन सुरु असतानाही भाजपने आपली इनकमिंग मोहीम जोरात सुरु ठेवली आहे. नाशिकमध्ये भाजप उद्धव ठाकरे यांना आज आणखी मोठा धक्का देत आहे.

ठाकरे गटात उरले सुरले अनेक नेते आणि माजी नगरसेवक गुरुवारी मुंबईत भाजपत प्रवेश करणार आहे. धक्कादायक म्हणजे यात विलास शिंदे यांच्या जागी ज्यांना महागरप्रमुख पद दिलं ते मामा राजवाडे हेच पक्षाला सोडून जात असल्याची माहिती आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मामा राजवाडे यांच्यासोबत उपनेते सुनिल बागुल, पक्षाच्या माजी नगरसेविका सीमा ताजणे, कमलेश बोडके, प्रशांत दिवे हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहे.

विशेष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महानगरप्रमुख पदी निवड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी मामा राजवाडे व सुनिल बागुल यांच्यावर एका मारहाण प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर हे दोन्ही नेते गायब होते, पोलिसांकडून त्यांचा शोध सुरु होता. त्यात अचानकपणे त्यांच्या भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याच्या बातम्या आल्याने त्यावरुन संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

संजय राऊत यांनी यासंदर्भात एक्स पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, भारतीय जमवा जमव पार्टी ची कमाल आहे. नाशिक मध्ये शिवसेना पदाधीकाऱ्यांवर आधी खोटे गुन्हे दाखल केले. हे सर्व पदाधिकारी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात गेले.

पोलिस अटक करतील म्हणून हे सगळे जण फरार झाले… क्लायमॅक्स असा की, हे सगळे फरार व भाजपा साठी गुन्हेगार असलेले आज भाजपात प्रवेश करत आहेत. जमवा जमव पार्टी ने महाराष्ट्राची वाट लावली आहे. सत्ता पैसा दहशत! दुसरे काही नाही!

Sanjay Raut | Uddhav Thackeray
Girish Mahajan Politics: इन्कम टॅक्स इफेक्ट; थोड्याच वेळा शिवसेना उद्धव ठाकरेंचे उपनेते सुनिल बागुल यांचा तीन माजी नगरसेवकांसह भाजप प्रवेश!

आजचा भाजप पक्ष म्हणजे डरपोक लोकांची डी गॅंग असल्याचा घणाघात संजय राऊत यांनी केला आहे. भाजप उद्या दाऊद इब्राहिमला सुद्दा पक्षात प्रवेश देईल असं राऊत म्हणाले आहेत. नाशिकमधून जे भाजपमध्ये प्रवेश करत आहेत या सर्वांवर गुन्हा दाखल झालेला असून अटक होण्याच्या भीतीने ते पोलिसांच्या रेकॉर्डनुसार फरार आहेत.

असे फरार व डरपोक लोकच भाजपमध्ये प्रवेश करत असून तुमच्यावर भ्रष्टाचार, दंगे, बलात्कार अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल असले तरच भारतीय जनता पक्षात प्रवेश दिला जातो अशी टीका राऊत यांनी माध्यमांशी बोलताना केली.

Sanjay Raut | Uddhav Thackeray
Seema Hiray Politics: भाजपच्या आमदार सीमा हिरे आणि बडगुजर यांच्यातील तणाव शिगेला, बडगुजर यांच्यावर केला गंभीर आरोप!

दरम्यान राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्षाचे नेते गणेश गिते हे देखील आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. या सगळ्यांच्या भाजपमधील पक्षप्रवेशाबाबत प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली होती. बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास सगळ्या हालचाली घडल्याची माहिती आहे.

यावेळी झालेल्या बैठकीनंतर मामा राजवाडे, सुनील बागूल आणि गणेश गिते यांना गुरुवारीच भाजपमध्ये प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. सगळे मिळून एकुण दहा जणांचा गुरुवार (ता. ३) दुपारी मुंबईतील भाजप मुख्यालयात या सगळ्यांचा पक्षप्रवेश पार पडेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com