Eknath khadse News: खडसेंचा प्रश्न, गिरीश महाजन यांनी जामनेर मतदारसंघासाठी केले तरी काय?

Girish Mahajan; NCP leader khadse criticized Girish Mahajan for corruption and anti incombency-माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर मतदारसंघासाठी एकही ठोस काम न केल्याचा गंभीर आरोप केला.
Eknath Khadse & Girish Mahajan
Eknath Khadse & Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Khadse Vs Mahajan News: जामनेर मतदार संघात जी काही मूलभूत कामे आणि पाटबंधारे प्रकल्प झाली, ती मी केली आहेत. गिरीश महाजन यांनी तीस वर्षात केले तरी काय?. त्यांनी मतदारसंघासाठी केलेले एक तरी काम सांगावे, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांनी दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार दिलीप खोडपे यांच्या प्रचारासाठी पहुर येथे जाहीर सभा झाली. यावेळी एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्या कामाचा अक्षरशः पंचनामा केला. गेल्या 30 वर्षात गिरीश महाजन यांनी मतदारसंघात कोणते ठोस आणि मोठे काम केले, हे सांगावे. ते ऐकण्यासाठी आमचे कान आतुर आहेत, असे खडसे म्हणाले.

Eknath Khadse & Girish Mahajan
Jayant Patil Politics: 20 नोव्हेंबर ही मतदानाची नव्हे, महाराष्ट्र ओरबाडणाऱ्या महायुतीला शिक्षा देण्याची तारीख!

राज्यातील जनतेला फोडाफोडीचे राजकारण पसंत नव्हते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडीच वर्षात काय काम केले? हे अद्याप महाराष्ट्राला समजलेले नाही. ते म्हणतात, मी पुन्हा आलो आणि नुसता एकटाच आलो नाही तर, दोन पक्ष फोडून आलो. हे कोणते अभिमानाचे काम फडणवीस यांनी केले आहे. महाराष्ट्राला अशी फोडाफोडी कधीही पसंत नव्हती. ती आपली संस्कृती नाही. त्याची शिक्षा देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला मतदार देतील, असा दावा खडसे यांनी केला.

Eknath Khadse & Girish Mahajan
Jayant Patil : अरे, तुमचा काकाच हा विषय पूर्ण करणार ; जयंतरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर

जामनेर मतदार संघात बहुर येथे धरण बांधण्यात आले वाघुर येथील धरण देखील मीच केले. भागपुर येथील धरणाला माझ्या काळातच मंजुरी देण्यात आली. 1998 मध्ये मंजूर झालेले हे धरण आणि त्याच्या कामाला अद्याप वेग आलेला नाही. आतापर्यंत 24 वर्ष झाली. मंत्री गिरीश महाजन आपल्या मतदारसंघातील एक प्रकल्पही पूर्ण करू शकलेले नाही. मग यांनी तीस वर्षात केले तरी काय? असा प्रश्न खडसे यांनी केला.

रस्ते, गटार, अन्य किरकोळ कामे हे तर नगरपालिका आणि जिल्हा परिषद करते. मंत्री महाजन यांनी मतदारसंघात एखादी सूतगिरणी आणली काय? अवनखेड येथील साखर कारखाना यांच्या कारकिर्दीत सुरू होऊ शकला नाही. टेक्सटाईल पार्क नाही. एमआयडीसी नाही. येथील युवकांना रोजगार मिळेल, असे एकही ठोस काम नाही. मात्र जिथे काहीच अस्तित्वात नाही तेथील प्रकल्पासाठी राज्य रकारकडून 32 कोटी रुपयांची हमी यांनी घेतली आहे. जिथे काहीच नाही त्यासाठी हे पैसे सरकारने त्यांना दिले. त्याचे काय झाले?

उपमुख्यमंत्री फडणवीस राज्याचे गृहमंत्री आहेत. त्यांनाच लोक धमक्या देऊन जातात. त्यामुळे त्यांना पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा लागतो. या राज्यातील एक माजी मंत्री बाबा सिद्दीकी हे हल्लेखोरांच्या हल्ल्यात मारले जातात. भारतीय जनता पक्ष एवढा महान आहे की, त्या पक्षाच्या आमदाराने थेट पोलीस ठाण्यात जाऊन गोळीबार केला. तो आता जेलमध्ये आहे. तर भाजपने त्याच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. भाजप या सगळ्या वर्तनातून महाराष्ट्रातील जनतेला काय संदेश देऊ इच्छितो, असा प्रश्न पडतो.

लोकसभा निवडणुकीत महायुतीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर यांना अचानक बहिणींची आठवण झाली. त्या लाडक्या झाल्या. त्याआधी बहिणी लाडक्या नव्हत्या का? आता पंधराशे रुपये घ्या आणि मतदान द्या. 50 रूपयाची साडी घ्या, भांडी घ्या असे प्रकार सुरू आहेत. त्या बदल्यात सरकारकडून आपल्याला महागाईचे गिफ्ट देण्यात आले आहे. या महागाईमुळे सर्वसामान्यांना जगणे मुश्किल झाले आहे. शेतकरी आत्महत्या करतो आहे. त्याकडे कोणाचेही लक्ष नाही.

----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com