Jayant Patil Politics: 20 नोव्हेंबर ही मतदानाची नव्हे, महाराष्ट्र ओरबाडणाऱ्या महायुतीला शिक्षा देण्याची तारीख!

Jayant Patil; CM Eknath Shinde led Maharashtra towards down, BJP will pay for it-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुख्यमंत्री आणि राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर गंभीर टीका
Eknath Shinde & Jayant Patil
Eknath Shinde & Jayant PatilSarkarnama
Published on
Updated on

NCP Vs BJP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रचार सभा झाल्या. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना अक्षरश: धुतले. महायुतीच्या सत्ता काळात महाराष्ट्र अधोगतीला गेला, असा आरोप त्यांनी केला.

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महायुतीच्या कारभाराचा अक्षरशः पंचनामा केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि त्यांच्या नेत्यांची झोप उडाली. रात्रंदिवस त्यांना महाविकास आघाडी दिसू लागल्याने ते एवढे घाबरले की, ते फक्त मंत्रिमंडळाच्या बैठका आणि प्रचाराचे फलक यातच गुंतून पडले.

Eknath Shinde & Jayant Patil
Jayant Patil : अरे, तुमचा काकाच हा विषय पूर्ण करणार ; जयंतरावांचे अजितदादांना प्रत्युत्तर

मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकावेळी दीडशे निर्णय होऊ लागले. सरकार जाणार म्हणून या कालावधीत हजारो निर्णय घेतले. त्यांची त्यांना फक्त जाहिरात करायची होती. लोकसभेआधी बहिणीला निवडणुकीत पाडायला निघाले होते, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भाषा अचानक बदलली.

Eknath Shinde & Jayant Patil
Sujay Vikhe : 'शिजायला लागलं की, पातेल्याला लाथ.., लोकसभेपासून ग्रहमान काही ठीक नाही'; सुजय विखे यांचे विधान

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे सगळे महायुतीचे लोक महाराष्ट्रातील जनतेचे सावत्र भाऊ आहेत, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. एकीकडे लाडकी बहीण योजनेचा डांगोरा पिटला आणि दुसरीकडे ऐन दिवाळीत महागाईचा आगडोंब उसळला. सामान्यांना जगणे मुश्किल झाले. मात्र यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या तोंडातून शब्दही निघाला नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राची अधोगती झाली आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न खाली आले. गुजरात राज्याचे उत्पन्न वाढले. याचा अर्थ गुजरात महाराष्ट्राच्या पुढे गेला आहे. पुण्याच्या हिंजवडीतील अनेक आयटी प्रकल्प अन्य राज्यात गेले. महिंद्रा, टाटा एअरबस, फेस्कॉन यांसह अनेक प्रकल्प गुजरातला गेले आहेत.

मुख्यमंत्री म्हणाले होते, पंतप्रधान मोदी यांनी मला फेस्कॉन पेक्षा मोठा प्रकल्प देणार, असे सांगितले आहे. आता दोन वर्षे झालेत, सरकार गेले तरी काही मिळाले नाही. त्यांना काय माहिती की, मोदी महाराष्ट्राला भोपळा देणार होते. प्रकल्प तर गेलेच आता महाराष्ट्राचे पाणी सुद्धा गुजरातला दिले जाणार आहे. हे रोखण्यासाठी आपल्याला भाजप आणि महायुतीला सत्तेपासून रोखावे लागेल. येत्या 20 तारखेला मतदानाची म्हणजेच महायुतीला शिक्षा देण्याची तारीख आहे हे लक्षात ठेवावे.

महायुतीचे सरकार राज्यात स्थापन झाले, तेव्हाच त्यांनी गुजरातचे मांडलिकत्व स्वीकारले होते. ज्यांच्यावर घोटाळ्यांचे आरोप त्या सगळ्यांना त्यांनी मंत्री केले. त्यामुळे येत्या निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्याशिवाय राहणार नाही. जनता, महाराष्ट्राला ओरबाडणाऱ्या महायुतीला घरी बसवेल, तेव्हाच निश्चिंत होईल, असे सध्याचे चित्र आहे.

महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर महालक्ष्मी योजना राबविली जाईल. त्यात महिलांना तीन हजार रुपये दरमहा देण्यात येतील. एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात येईल. शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल. रुग्णालयात कुटुंबासाठी 25 लाखांपर्यंतचा उपचार होतील असे विमा कवच देण्यात येईल. आमचे सरकार ही पंचसुत्री प्रत्यक्षात आणेल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com