Ajit Pawar News : अजितदादांची गिरीश महाजनांनी केली स्तुती; म्हणाले, "राज्यात अजितदादा सरसच पण..."

Girish Mahajan in Jalgaon : राष्ट्रवादी पक्षातील निर्णयांवर बोलणे टाळले
Girish Majahan, Ajit Pawar
Girish Majahan, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Girish Mahajan on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त दिल्लातील कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही महत्वाच्या घोषणा केल्या. यावेळी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांची निवड केली. अनेक नेत्यांवर महत्वाची जबाबदारी दिली. दरम्यान, विरोध पक्षनेते अजित पवार यांना पक्षाची नवीन कुठलीही जबाबदारी दिली नसल्याची चर्चा सुरू आहे. (Latest Marathi News)

या नियुक्तीनंतर अजितदादा नाराज असून ते भाजपच्या (BJP) वाटेवर असल्यच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. यावर विचारले असता भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्टच उत्तर दिले. महाजन यांनी जळगाव येथील एका कार्यक्रमात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी महाजन यांनी अजित पवार यांची बाजू घेत त्यांची तोंडभरून स्तुती केली. अजित पवार राज्यातील एक सक्षम नेतृत्व असल्याचेही मान्य केले.

Girish Majahan, Ajit Pawar
Dilip Walse-Patil on Maharashtra Politics: 'नक्की आपले कोण आहेत, याची माहिती आपल्याला पाहिजे..; दिलीप वळसे-पाटील असं का म्हणाले...

अजित पवार (Ajit Pawar) यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये साईडलाईन केले जात आहे का? असे विचारले असता महाजन म्हणाले, "हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. राज्यात दादा हे एक सक्षम नेतृत्व होते. जे आहेत त्यांच्यापेक्षाही ते सरसच होते. हे राज्यातील सर्वांनाच मान्य आहे. अशा परिस्थितीत दादांना बाजूला सारले गेले. त्यांच्याकडे मोठी जबाबदारी दिली गेलेली नाही. त्यामुळे मला वाटते त्यांच्या हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वादाचा भाग किंवा अंतर्गत निर्णयाचा भाग आहे. यामध्ये आपण न पडलेले बरे. पण निश्चितच दादा हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्षम नेतृत्व आहे."

Girish Majahan, Ajit Pawar
Eknath Shinde News : 'देशात मोदी-महाराष्ट्रात शिंदे', मुख्यमंत्रीपदासाठी शिंदेना फडणवीसांपेक्षा जास्त पसंती? ; शिवसेनेचा सर्व्हे..

यावेळी अजित पवार भाजपच्या वाटेवर आहेत का, असाही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर मात्र उत्तर देणे गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी टाळले. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली होती. त्यावर अजितदादांनी स्वतः पुढे येत या चर्चांना काही अर्थ नसल्याची स्पष्ट केले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वर्धापनदिनी काही महत्वाच्या नियुक्ती करण्यात आल्या. यात अजित पवार यांना स्थान दिले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अजितदादा नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. दरम्यान, अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्याकडे ही मोठी जबाबदारी असल्याने त्यांना आता पक्षाचे पद दिले नसल्याचे खुद्द शरद पवार (Sharad Pawar) यांनी स्पष्ट केले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com