गिरीश महाजन म्हणाले, `आनंदाचा शिधा` घोषणेत घाईच झाली!

शिंदे सरकारची आनंदाचा शिधा योजना फसल्याने शंभर रुपये परताव्याची काँग्रेसची मागणी.
Girish Mahajan
Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

धुळे : राज्यात दिवाळीत (Diwali) घिसाडघाईने गरिबांसाठी जाहीर झालेली आनंदाची शिधा ही योजना फसली आहे. त्यातील विविध वस्तू गायब आहेत. तरीही लाभार्थ्यांकडून शंभर रुपये घेतले. आनंदाचा शिधा परिपूर्ण मिळाला नसल्याने प्रत्येकी शंभर रुपयांचा परतावा करावा, अशी मागणी काँग्रेसने (Congress) पालकमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. (Congress deemands diwali ration scheme fail repay 100 rs)

Girish Mahajan
‘ड्रायपोर्ट’, हाय स्पीड रेल्वे प्रकल्प गुजरातला जातील

यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी म्हणाले, अंत्योदय व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्याला प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चनाडाळ, तेल देण्याचा निर्णय झाला. प्रत्यक्षात जिल्ह्यात साखर मिळालीच नाही.

Girish Mahajan
Chhagan Bhujbal: `जरा धीर धरा आपले दिवस परत येतील`

राज्यात इतरत्र साखर, रवा मिळाला, तर डाळ नाही, काही ठिकाणी चनाडाळ नाही, अशी स्थिती होती. तरीही लाभार्थ्याकडून प्रत्येकी शंभर रुपये घेतले गेले. आनंदाचा शिधा परिपूर्ण मिळाला नसल्याने प्रत्येकी शंभर रुपयांचा परतावा करावा.

पालकमंत्री महाजन शुक्रवारी दौऱ्यावर होते. त्यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्‍यामकांत सनेर, प्रदेश सदस्य युवराज करनकाळ यांनी चर्चा करत पालकमंत्र्यांना आनंदाचा शिधाप्रश्‍नी मागण्यांचे निवेदन दिले. त्याचा आशय असा : आनंदाची शिधा योजना फसली असून कुठे डाळ, तर कुठे साखर मिळाली नाही. तरीही शंभर रुपयांची वसुली करण्यात आली. ही वसुली थांबवत जास्तीचे घेतलेले पैसे लाभार्थ्यांना परत करावे.

सार्वजनिक वितरण प्रणाली योजना गेल्या तीन ते चार वर्षाच्या कालखंडात नियोजनाअभावी बदनाम होऊ पाहत आहे. काही स्वार्थी दुकानदार या योजनेचा गैरफायदा घेत आहेत. तसेच आजही पॉज मशिन अपेक्षित काम करत नाही. त्यामुळे रेशन दुकानदारांची गैरसोय होते. लाभार्थ्यांना वेळेवर धान्य न मिळाल्याने हाल होतात.

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने लाभार्थ्यांना शंभर रुपयात आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय घेतला. परंतु, दिवाळीत पॉज मशिनने दगा दिला. दिवाळीपर्यंत शिधाचा परिपूर्ण पुरवठा झाला नाही. जिल्ह्यात साखर उपलब्ध झाली नाही. त्यामुळे रेशन दुकानदार आणि लाभार्थ्यांमध्ये खटके उडून दिवाळी कडू झाली. साखर व तेल जिल्ह्यातच उपलब्ध नसल्यामुळे पैशांची वसुली थांबवावी. अपूर्ण वस्तू मिळालेल्या लाभार्थ्यांना त्यांचे पैसे परत करावेत, अशी मागणी श्री. सनेर, श्री. करनकाळ, प्रकाश पाटील, राजेंद्र देवरे, डॉ. भरत राजपूत, नरेंद्र पाटील, धनंजय कुवर, सचिन पवार, भूषण भदाणे आदींनी चर्चेवेळी केली.

गौतम अदानींकडून तेल

काँग्रेसच्या मागणीवर सकारात्मक प्रतिसाद देत पालकमंत्री महाजन यांनी या योजनेविषयी खंत व्यक्त केली. योजनेसंदर्भात घाई झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या. परंतु, शासन निश्चित शिल्लक वस्तू लाभार्थ्यांपर्यंत पोचवेल. तेल मिळत नव्हते, परंतु गौतम अदानी यांनी तेल उपलब्ध करून दिल्याचे पालकमंत्री महाजन यांनी सांगितल्याचे श्री. सनेर म्हणाले.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com