Jalgaon BJP Politics: उमेदवारीसाठी भाजपकडे प्रस्थापितांची कसोटी, आरक्षण बिघडवणार अनेकांची गणिते?

Girish Mahajan;Signs of a dilemma for the established due to reservation by BJP in Jalgaon Municipal Corporation -ओबीसी आरक्षणामुळे महापालिकेच्या राजकारणातील प्रस्थापित नेत्यांच्या राजकारणाला बसू शकतो फटका
Jalgaon Municiple Corporation Building
Jalgaon Municiple Corporation BuildingSarkarnama
Published on
Updated on

BJP News: आगामी महापालिका निवडणुकीसाठी जळगाव मध्ये भारतीय जनता पक्षात जोरदार इनकमिंग होत आहे. मात्र ओबीसी आरक्षणाच्या निर्णयाने उमेदवारीसाठी अनेकांची कसोटी लागणार आहे. यात महापालिकेच्या राजकारणातील प्रस्थापित नेत्यांची चांगलीच कोंडी होण्याची चिन्हे आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी घटकांसाठी २७ टक्के आरक्षण कायम ठेवले आहे. त्यामुळे निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. भारतीय जनता पक्षासह सर्वच पक्षांनी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. जळगाव महापालिकेत नेत्यांनी जोरदार फिल्डींग लावली आहे.

सध्या महायुतीकडे शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष आणि भाजप निवडणुकीसाठी जोरदार तयारी करीत आहे. यामध्ये महापालिकांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष काहीसा कमकुवत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे निवडणुकीच्या जागा वाटपा पेक्षाही योग्य उमेदवाराला आणि निष्ठावंतांना उमेदवारी देताना नेत्यांचा कस लागेल. त्यात उमेदवारांची कसोटी असेल.

Jalgaon Municiple Corporation Building
BJP Politics: पोलिसांचा अजब न्याय; न्याय मागायला गेला आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा घेऊन आला!

जळगाव महापालिकेत चार सदस्यांचा प्रभाग आहे. सध्याच्या लोकसंख्येनुसार प्रभागांची संख्या ७५ अशी कायम राहिली आहे. यातील ५८ जागा राखीव आहेत. ओबीसी घटकांसाठी वीस जागा असून दहा महिला आणि दहा पुरुषांना उमेदवारीची संधी मिळेल. मागास प्रवर्गासाठी दहा जागा राखीव आहे. त्यात पाच महिला आणि पाच पुरुष असतील. एकंदर ३८ जागांवर महिलांना संधी मिळणार आहे.

नव्या आरक्षण पद्धतीने नुसार ३८ जागांवर महिलांना संधी मिळेल. ही स्थिती प्रस्थापित नेत्यांची अडचण करू शकते. महिला आरक्षणामुळे अनेक प्रस्थापित भाजप नेत्यांना आत्तापासून चिंता वाटू लागली आहे. या जागा वाटपामुळे अनेकांचे प्रस्थापित राजकारण थांबण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे आरक्षणानंतर उमेदवारी मिळविण्यासाठी नेत्यांची चांगलीच कसोटी लागेल.

सध्या भाजपकडे इन्कमिंग जोरात आहे. कोणत्याही स्थितीत निवडणुका जिंकायचा हे भाजपचे धोरण आहे. त्यामुळे विविध पक्षातील नेत्यांनी उमेदवारीच्या अपेक्षेने प्रवेश केला आहे. अशा नेत्यांचा मोह अभंग होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपच्या नेत्यांना आपल्या समर्थकांना उमेदवारी देताना अनेक अडचणी आणि तारेवरची कसरत अशी स्थिती आहे.

सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. त्यामुळे अनेक प्रस्थापित नेते सत्तेच्या सावलीसाठी भाजपचा मार्ग निवडत आहे. सध्या भाजपचे धोरण मात्र तरुण आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याची आहे. देशात आणि राज्यातही नव्या तरुणांना संधी देण्याच्या भाजपच्या धोरणामुळे वर्षानुवर्ष राजकारणात ठाण मांडलेल्या प्रस्थापितांची मात्र ऐनवेळी कोंडी होऊ शकते. त्याचा महाविकास आघाडी कडून काही प्रमाणात लाभ उठविला जाण्याची शक्यता आहे.

--------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com