BJP Politics: पोलिसांचा अजब न्याय; न्याय मागायला गेला आणि ॲट्रॉसिटीचा गुन्हा घेऊन आला!

Yashwant Nikule; BJP ex-corporators file a case of atrocity in Vikopal over conspiracy allegation - न्यायासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या प्राध्यापकावरच पोलिसांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याने आश्चर्य
Prof Rahul Singh & Yashwant Nikule
Prof Rahul Singh & Yashwant NikuleSarkarnama
Published on
Updated on

Nashik Crime News: भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे आणि प्राध्यापक सिंग यांच्यात कारला कट मारल्याच्या कारणावकरून बुधवारी वाद झाला होता. राजकीय प्रतिष्ठेतून हा वाद टोकाला पोहोचला आहे. यामध्ये भाजपच्या माजी नगरसेवकाच्या राजकीय इर्षेतून एका प्राध्यापकावर मात्र संकट ओढवले आहे.

नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथे रॉंग साईडने आलेल्या अर्धा वाहनाने प्राध्यापक राहुल धिरेंद्र सिंग यांच्या वाहनाला कट मारला. त्याचा जाब विचारल्याने संबंधित रॉंग साईडने वाहन चालविणाऱ्या नेत्याने सिंग यांना चांगलेच धमकावले. गाडीतून पिस्तूल काढून जीवेठार मारीन अशी धमकी दिल्याची बातमी बुधवारी सगळीकडे झळकली.

या संदर्भात चौकशी केल्यानंतर संबंधित धमकी देणारे भाजपचे माजी नगरसेवक यशवंत निकुळे असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भात प्राध्यापकाला थेट बंदुकीने धमकावल्याने प्राध्यापक सिंग हे चांगलेच घाबरले होते. दिवसभर त्यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. मात्र पोलिसांनी त्यांना दाद दिली नव्हती.

Prof Rahul Singh & Yashwant Nikule
NCP Sharad Pawar Politics: महाविकास आघाडीत सध्या तरी बिघाडी, राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांची कबुली!

दिवसभर सोशल मीडियावर या प्रकरणाची जोरदार चर्चा होती. सायंकाळी प्राध्यापक सिंग यांनी फेसबुक वरून आपल्याला मदत मिळावी आणि जीवाची हमी मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांसह पोलीस आयुक्त आणि गृह खात्याला पत्र लिहिले. फेसबुक वरून त्यांनी आपण एकटे असल्याने आपल्याला संरक्षण मिळावे अशी विनंती केली होती.

पोलीस ठाण्यात न्याय मागण्यासाठी गेलेल्या प्राध्यापक सिंग यांना दुसऱ्या दिवशी मात्र धक्कादायक प्रकाराला सामोरे जावे लागले. न्याय मागण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलेल्या प्राध्यापक सिंग यांच्यावरच भाजपचे माजी नगरसेवक निकुळे यांनी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केल्याचे स्पष्ट झाले. या संदर्भात पोलिसांनी सिंग हे दूध विक्रेते असल्याचा विपर्यास देखील केला आहे. दिवसभर पोलीस ठाण्यात असलेल्या व्यक्तीवर असा गुन्हा दाखल झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजप नेते निकुळे यांनी आपण मुलाला शाळेत सोडायला जात होतो. यावेळी स्कूटर वर दूध विक्री करणाऱ्या राहुल धीरेंद्र सिंग यांनी तुम्ही एसटी गटातून नगरसेवक म्हणून निवडून आला आहात. तुम्ही कसे काय निवडून आले? तुम्हाला नगरसेवक म्हणून काढून टाकण्यात येईल. अशी जातीवाचक शिवीगाळ केल्याचे सांगितले आहे.

एकंदरच नाशिक पोलिसांच्या कमी होत चाललेल्या प्रभावाने आणि वाढत्या राजकीय दबावाने किरकोळ प्रकरण कोणत्या थराला जाते याचा अनुभव या निमित्ताने नाशिककरांना आला आहे. याबाबत दिवसभर समाज माध्यमांवर पोलिसांना ट्रोल करण्यात येत होते. काही सामाजिक संघटनांनी मात्र प्रा. सिंग यांची मदत करण्याची तयारी दाखवली आहे.

-------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com