BJP Vs NCP News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला धक्क्यावर धक्के बसत आहेत. जळगाव जिल्ह्यात भाजपने आपल्या विरोधकांना संपविण्यासाठी मोठी व्युहरचना केली आहे. राज्यातील महायुतीच्या सत्तेमुळे विरोधी पक्षातील पराभूत उमेदवार देखील त्यांच्या गळाला लागत आहेत.
पारोळा (जळगाव) विधानसभा मतदारसंघावर माजी खासदार वसंत मोरे यांची चांगली पकड आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा किल्ला लढवला होता. मात्र आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला हा मोठा धक्का बसला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पाचोरा येथील नेते दिलीप वाघ यांनी भाजप पक्षात प्रवेश केला होता. पाठोपाठ लगेचच पारोळा येथील माजी खासदार मोरे यांचे पुत्र जिल्हा दूध संघाचे संचालक पराग मोरे आणि बाजार समितीचे संचालक ॲड रोहन मोरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. प्रवेशामुळे पारोळा तालुक्यातील राजकारणात मोठे फेरबदल होणार आहेत. भाजप अधिक प्रबळ झाल्याने विरोधकांना त्याचा फटका बसेल.
भाजपच्या मुंबईतील कार्यालयात पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विधान परिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार मंगेश चव्हाण आदी नेते यावेळी उपस्थित होते. मोरे यांच्या विविध समर्थकांनी देखील यावेळी भाजप पक्षात प्रवेश केला.
यावेळी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माजी खासदार वसंत मोरे यांच्या राजकीय योगदानाचे कौतुक केले. मोरे कुटुंबीय भाजपात दाखल झाल्याने पारोळ्याच्या राजकारणाला कलाटणी मिळेल. मोरे कुटुंबीयांचा भाजप पक्षाकडून योग्य सन्मान केला जाईल, असे बावनकुळे म्हणाले.
केंद्रात आणि राज्यात महायुतीची सत्ता आहे. त्यामुळे विरोधी पक्षात असलेल्या नेत्यांना विरोधात राहून काम करणे अडचणीचे वाटू लागले आहे. आगामी जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकीत बहु सदस्यीय प्रभाग रचना असल्याने विरोधकांचा टिकाव लागणे अवघड आहे. या राजकीय स्थितीची जाणीव झाल्याने महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांना सत्ताधारी पक्षात जाण्याचे वेध लागले आहे. तशा घडामोडी घडत आहेत. जळगाव जिल्ह्यात त्यामुळे तो चर्चेचा विषय बनला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.