Girish Mahajan News : एकनाथ खडसेंची घरवापसी ? गिरीश महाजन म्हणाले, 'त्यांची वरुन हॉटलाईन असेल तर...'

NCP's Eknath Khadse joining BJP : त्यांना घ्यायचं न घ्यायचं याबाबत मला विचारलेल नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे.
Girish Mahajan, Eknath Khadse
Girish Mahajan, Eknath KhadseSarkarnama
Published on
Updated on

Jalgaon News : महाराष्ट्रात सध्याच राजकारण हे विचाराच्या पलिकडे गेल्याचे चित्र आहे. पक्ष फोडाफोडी, आमदार पळवापळवी, या पक्षातून त्या पक्षात उड्या मारण्याचे प्रमाण मर्यादेच्या पुढे गेले आहे. असा स्थितीत कोणी पक्षाचा राजीनामा देत असेल किंव्हा घरवापसी करत असेल तर त्यात काही नवल वाटण्यासारख घडत नसल्याची मानसिकता आता जनतेची झाली आहे.

आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राजीनामा दिला. याने संपूर्ण राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. अशातच आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे घरवापसी करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्यामुळे खडसेंच्या भाजप प्रवेशाविषयी मंत्री गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी मिश्किल टिप्पणी करत प्रतिक्रिया दिली.

Girish Mahajan, Eknath Khadse
Ashok Chavan Resignation : अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर भाजपचे शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींमुळे...

यावेळी ते म्हणाले, 'एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. त्यांचे निरोप भरपूर येत आहेत. पण मला त्या संदर्भात काही माहीत नाही. त्यांचे फार प्रयत्न चालू आहेत. जोर लावून त्यांचे प्रयत्न चालू असल्याचं मला कळतयं. दिल्लीकडूनही कळालं आणि राज्याकडूनही कळाले आहे. पण मला याबाबतीत अजून काही विचारणा झालेली नाही आणि तसं काही प्रयोजन मला तरी दिसत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मला विचारायचं म्हटलं तर मला अजून कोणीही विचारलेलं नाही. त्यांना घ्यायचं न घ्यायचं याबाबत मला विचारलेल नाही. कारण मी छोटा कार्यकर्ता आहे. वरुन जर त्यांची काही लाईन असेल हॉटलाईन तर त्यांनी लावावी. चांगलं आहे वरुन जर सिग्नल मिळाला तर', अशा शब्दात महाजन यांनी मिश्किल टिप्पणी करत खडसेंच्या भाजप प्रवेशावर प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसे हे जळगाव जिल्ह्यातील भाजपचे नेते होते. मध्यंतरी भाजपमध्ये मिळत असलेल्या वागणुकीमुळे त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. मात्र तेथेही त्यांना फारसं काही न मिळाल्याच बोलले जाते. त्यानंतर राष्ट्रवादीच फुटून महायुतीत सामील झाल्याने सर्वांचीच गोची झाली. तीच परिस्थिती खडसे यांची झाली. त्यामुळे ते पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करतील या चर्चेला उधाण आल आहे.

Girish Mahajan, Eknath Khadse
Supriya Sule on Fadnavis : 105 आमदार निवडून आणल्यानंतरही फडणवीस नापास अन्...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com