Supriya Sule on Fadnavis : 105 आमदार निवडून आणल्यानंतरही फडणवीस नापास अन्...

Maharashtra Politics: उपमुख्यमंत्र्यांच्या अधोगतीचे सुप्रिया सुळेंनी मांडले गणित
Supriya Sule and Devendra Fadnavis
Supriya Sule and Devendra FadnavisSarkarnama

Pune News: 105 आमदार निवडून आणल्यानंतरसुद्धा देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्री करण्यात आले. तसेच दोन उपमुख्यमंत्रीसुद्धा करण्यात आले. दहापैकी दहा गुण मिळवणारे फडणवीसांच्या पदरात प्रत्यक्षात अडीचच मार्क्स मिळालेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने नापास झाल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. Supriya Sule on Fadnavis

भाजपवर आगपाखड करताना त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पाठराखणसुद्धा केली. गडकरी हे भारतीय जनता पक्षाचे असले तरी सर्वांनाच प्रेम मानसन्मान देतात. भाजपमध्ये असतानादेखील त्यांचे चांगले काम सुरू आहे. चांगल्याला चांगल म्हटलेचं पाहिजे, अशी भूमिका सुळे यांनी मांडली. दुर्दैवाने गडकरींना सध्या साइडट्रॅक केले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. राज्यात आणि पुणे शहरामध्ये वाढलेल्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे सातत्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. Maharashtra Politics

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महागाई बेरोजगारीच्या मुद्द्यावर लढणार

बारामती (Baramati) मतदारसंघातील निवडणूक खूपच महत्त्वाची ठरणार आहे. येथील समस्यांबाबत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरद पवार पक्षाच्या खासदार सुळे म्हणाल्या, ‘मतदारसंघामधील नागरिकांना जेव्हा भेटते तेव्हा पाणी, बेरोजगारी शेतीमालाला हमीभाव ही मोठी आव्हाने मला समोर दिसतात. मी मतदारसंघातील प्रश्नांसाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा करत असते. मात्र, माझ्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं जातं. त्यामुळे आगामी लोकसभा (Lok Sabha) निवडणूक महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावरती लढणार असल्याचं सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी स्पष्ट केलं.Supriya Sule on Fadnavis

Edited By : Arvind Jadhav

R

Supriya Sule and Devendra Fadnavis
Ravindra Dhangekar On Chavan Resign: चव्हाणांच्या विश्वासावर काँग्रेसमध्ये आलेल्या धंगेकरांचं काय ठरलं?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com