Girish Mahajan and Nashik BJP : प्रभारी नेमणुकीतून गिरीश महाजनांचे अधिकार छाटले ? पालवेंनी केला खुलासा

District Incharge of BJP : राजेंद्र गावीत नाशिक शहरासह जिल्ह्याचे प्रभारी
Rajendra Gavit, Girish Mahajan
Rajendra Gavit, Girish MahajanSarkarnama
Published on
Updated on

Rajendra Gavit Incharge of Nashik : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मे महिन्याच्या सुरुवातीलाच त्यांची नवी टीम जाहीर केली होती. त्यानुसार त्यांनी गुरुवारी (ता. २५) महाराष्ट्र भाजप संघटन विस्तार व पक्ष बळकटीसाठी विभाग प्रभारी व जिल्हा प्रभारी यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. प्रदेश सरचिटणीस यांना संबंधित विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. यात राजेंद्र गावीत यांची नाशिक शहर, उत्तर नाशिक आणि दक्षिण नाशिकच्या प्रभारीपदी नेमणूक करण्यात आली आहे.

Rajendra Gavit, Girish Mahajan
Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाडाच करमुसे मारहाण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार

मूळचे नंदूरबारमधील असलेले राजेंद्र गावीत (Rajendra Gavit) पालघरचे खासदार आहेत. नाशिक जिल्ह्यातील सर्व विभागांवर त्यांची प्रभारी म्हणून नेमणूक केल्याने चर्चांना उधाण आले आहे. या नेमणुकीतून मंत्री गिरीश महाजन यांचे अधिकार कमी करण्यात येणार असल्याचे राजकीय वर्तुळातून बोलले जात आहे. या चर्चांना मात्र भाजपकडून छेद देण्यात आला. याबाबत नाशिक भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे यांनी मंत्री महाजन यांचे उत्तर महाराष्ट्रातील स्थान आणि अधिकार कायम असल्याचे स्पष्ट केले.

पालवे म्हणाले, "मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) हे भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील प्रबळ नेते आहेत. उत्तर महाराष्ट्रातील निवडणुका आणि महाजन हे समीकरण सर्वश्रुत आहे. प्रभारी पदाच्या नेमणुका हा भाजपचा संघटनात्मक रचनांचा भाग आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर भाजप प्रदेश पदाधिकारी, सरचिटणीस यांना विभागीय प्रभारी म्हणून तर उपाध्यक्ष व चिटणीस यांना जिल्हा प्रभारी म्हणून जबाबदारी दिली आहे." (Nashik BJP)

Rajendra Gavit, Girish Mahajan
Ahmednagar News: खुर्चीवरून मानापमान नाट्य; फडणवीसांची राम शिंदेंना 'खास' ट्रीटमेंट; तर विखे पाटलांना सूचक इशारा

गिरीश महाजन यांच्या अधिकारात कुठलेही बदले झाले नाहीत. ते आबाधित असल्याचेही पालवे यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "उत्तर महाराष्ट्र (Maharashtra) निवडणुकांसह विविध अधिकार मंत्री गिरीश महाजन यांच्याकडेच असून ते कायम असतील. जिल्हा प्रभारी व उत्तर महारष्ट्र प्रभारी महाजन यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेतील. महाजन संकटमोचक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांचे अधिकार अबाधित आहेत. त्यात कुठलाही फरक झालेला नाही. त्यांचे अधिकार छाटले नाहीत. फक्त पक्षाची संघटनात्मक रचना म्हणून प्रभारींच्या नेमणुका केल्या आहेत."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com