Jitendra Awhad News : जितेंद्र आव्हाडाच करमुसे मारहाण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार

Thane Police on Jitendra Awhad : आव्हाडांविरोधात ठाणे पोलिसांचे ५०० पानाचे आरोपत्र
Jitendra Awhad
Jitendra AwhadSarkarnama
Published on
Updated on

Jitendra Awhad Mastermind of Karmuse Assualt Case : अनंत करमुसे मारहाण प्रकरणी ठाणे पोलिसांनी ५०० पानाचे तिसरे पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे अनंत करमुसे प्राणघातक हल्ला प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

घोडबंदर येथील कावेसर भागात राहणाऱ्या अनंत करमुसे यांनी ५ एप्रिल २०२० मध्ये तत्कालीन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याविरोधात समाजमाध्यमावर आक्षेपार्ह विधान केले होते. यानंतर आव्हाड यांच्या सुरक्षारक्षक आणि काही कार्यकर्त्यांनी करमुसे यांचे अपहरण केले. त्यांना आव्हाड यांच्या निवासस्थानी नेले.

तेथे आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी करमुसे यांना बेदम मारहाण केली होती. त्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात आव्हाडांसह २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानुसार आव्हाड यांच्या दोन अंगरक्षकांसह ११ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांनंतर जामिनावर सुटका करण्यात आली. (Jitendra Awhad Mastermind of Karmuse Assualt Case)

Jitendra Awhad
Paranda Bazar Samiti : सावंतांच्या मतदारसंघातील बाजार समितीवर ठाकरे गटाचा झेंडा; संचालकांच्या अपहरणामुळे निवडणूक राज्यात गाजली

करमुसे यांनी त्यांना मारहाण होत असताना आव्हाड तेथे हजर होते, असा आरोप केला होता. त्यानंतर त्यांनी तपासातील त्रुटी दाखवून त्यांनी उच्च न्यायालय (High Court) आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने ठाणे शहर पोलिसांना सखोल तपासाचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पोलिसांनी आता तिसरे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात करमुसे यांना मारहाण प्रकरणाचे मुख्य सूत्रधार म्हणून जितेंद्र आव्हाड यांचे नाव नमूद केल्याचे ठाणे पोलीस (Thane Police) अधिकाऱ्यांनी सांगितले.

Jitendra Awhad
Eknath Shinde News : कोर्टानं सरकारचा तर सरकारनं 'समृद्धी'चा मार्ग मोकळा केला; मुख्यमंत्री शिंदेचा विरोधकांना टोला

दरम्यान, फेब्रवारीच्या अखेरीस अनंत करमुसे मारहाण प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने महत्त्वाचे आदेश दिले आहेत. यात राज्य सरकारची या प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी न्यायालयाने फेटाळली होती. तर राज्य सरकारच्या तपास यंत्रणांना पुन्हा तपास करण्याचे आदेश दिले होते. या प्रकरणाचा तपासाचा अहवाल तीन महिन्यांच्या आत सत्र न्यायालयात सादर करावा असे निर्देश न्यायालयाने होते. त्यानुसार आता तिसरे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com