Gokul Zirwal Politics: आदिवासी विकास महामंडळाचा पहिला निकाल जाहीर; गोकुळ झिरवाळ, इंद्रनील गावित विजयी!

Gokul Zirwal wins in the prestigious election of Tribal Development Corporation, defeat Shivram Zole -आदिवासी विकास महामंडळाच्या प्रतिष्ठेच्या निवडणुकीत गोकुळ झिरवाळ आणि इंद्रनील गावित मोठ्या मताधिक्याने विजयी झाले.
Gokul Zirwal with supporters
Gokul Zirwal with supportersSarkarnama
Published on
Updated on

Tribal Corporation News: महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी आज झाली. या निवडणुकीचा पहिला निकाल जाहीर झाला आहे. या निमित्ताने राज्यातील आदिवासी क्षेत्रातील नेते व कार्यकर्ते नाशिकला जमले आहेत.

महाराष्ट्र राज्य आदिवासी विकास महामंडळाची प्रतिष्ठेची निवडणूक नुकतीच झाली. त्याची मतमोजणी नाशिक येथे आज सुरू आहे. या निवडणुकीचा पहिला निकाल हाती लागला आहे.

नाशिक गटातून राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ आणि मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्षाचे नेते, माजी आमदार जे. पी. गावित यांचे चिरंजीव इंद्रनील गावित विजय झाले. या दोघांच्या समर्थकांनी निकाल जाहीर झाल्यावर जल्लोष केला.

Gokul Zirwal with supporters
Sameer Bhujbal : भुजबळ काका-पुतण्यांना जबरदस्त धक्का, सुहास कादेंनी सगळा गेमच फिरवला

या गटात १६३ मतांपैकी गोकूळ झिरवाळ यांना १०७ तर इंद्रनील गोवित यांना ८७ मते मिळाली. दोघांनाही पॅनेलमध्ये सर्वाधिक मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषीत करण्यात आले. विभागातील सर्वाधिक मतदान त्यांना झाले.

नाशिक विभाग गटात माजी आमदार शिवराम झोले आणि महामंडळाचे माजी संचालक आनंदा चौधरी यांचे चिरंजीव मनोहर चौधरी आणि विजय गवळी यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला. या निवडणुकीत वामन हिरामन खोसकर आणि मनोहर चौधरी यांनी शेवटच्या टप्प्यात झिरवाळ आणि गोवित यांना पाठींबा जाहीर केला होता.

गोकुळ झिरवाळ आणि इंद्रनील गावित यांचे एकत्र पॅनल होते. आज सकाळी आदिवासी विकास महामंडळाच्या सभागृहात मतमोजणीला सुरुवात झाली. या निवडणुकीत राज्यभरातील आदिवासी संस्था आणि नेते मतदार आहेत. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जाते.

-----

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com