Padalkar Meet Bhujbal : गायब असलेले पडळकर पोहोचले भुजबळांच्या भेटीला; ऐन निवडणुकीत ओबीसी नेत्यांमध्ये काय शिजतंय?

Lok Sabha Election 2024 : ओबीसींची मते तुम्हाला नको का? असाही प्रश्न ओबीसी समाजातून विचारला जात आहे.
Padalkar Meet Bhujbal
Padalkar Meet BhujbalPadalkar Meet BhujbalSarkarnama

Nashik Shinde : भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेवरील आमदार गोपीचंद पडळकर आता राष्ट्रवादीचे नेते मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीसाठी पोहचलेले आहेत. पडळकर यांची नाशिकच्या भुजबळ फार्म वरती त्यांची बैठक सुरु आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीत दोन ओबीसी नेत्यांमध्ये नेमकी कसली चर्चा होत आहे, याकड सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

गोपीचंद पडळकर सध्या भुजबळ फार्म येथे पोहचलेले आहेत. भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यासाठी ऐन निवडणुकांच्या काळमध्ये पडळकर पोहोचलेले आहेत. निवडणुकीच्या काळात दोन ओबीसी नेत्यांनी जोरदार मोर्चा लढावला होता. हे दोन नेते आज पुन्हा भेटत आहेत. त्यांच्यात नेमकी काय चर्चा होत आहे, याची सर्वांना उत्सुकता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Padalkar Meet Bhujbal
Sanjay Raut News : आश्रयदाते उद्योजकांवर हल्ला म्हणजे, मोदींचा पराभव; खासदार संजय राऊत यांचा दावा !
Padalkar Meet Bhujbal
Shirur Lok Sabha: आज्ञाधारक अमोल कोल्हे बघितला, आता कफन बांधलेला बंडखोर..., कोल्हेंचं थेट अजितदादांना आव्हान

उमेदवारी घोषित होण्यास विलंब झाल्यामुळे मी नाशिक लोकसभेतून माघार घेतोय, असं भुजबळ म्हणाले होते. यामुळे ओबीसी समाजामध्ये कुठेतरी नाराजी आहे, अशी जोरदार चर्चा आहे. अशा आशयाचे नाशिकमध्ये होर्डींग्सही लागले होते. ओबीसींची मते तुम्हाला नको का? असाही प्रश्न ओबीसी समाजातून विचारला जात आहे. अनेक ओबीसी नेते भुजबळांची (chhagan Bhujbal) भेट घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com