राज्यपाल म्हणाले, ‘गोल्डन शेकहॅण्ड’च्या घटना घडू नयेत!

महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॅामर्स अँड अॅग्रीकल्चर संस्थेचा सुवर्णमहोत्सव राज्यपालांच्या उपस्थितीत झाला.
Governer Bhagatsingh Koshiyari
Governer Bhagatsingh KoshiyariSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्हा हा कृषी (Agreeculture) समृद्धीसाठी ओळखला जातो. उत्तराखंडहून लोक नाशिकमधील शेतीचे प्रयोग पाहायला येतात. हेच इथले वेगळेपण आहे. त्यामुळे उद्योगाच्या विकासाचा विचार करताना इथल्या शेतीच्या विकासाचा फोकस ठेवावा, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh koshiyari) यांनी येथे केले.

Governer Bhagatsingh Koshiyari
भाजप नगरसेविकेच्या पतीला मारहाण करीत कपडे फाडले!

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उत्तर महाराष्ट्र शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले, देशाच्या विकासात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे योगदान वादातीत आहे. आध्यात्मिक, ऐतिहासिक नाशिक शहरात चेंबर ऑफ कॉमर्सच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमाची रूपरेषा ही महाराष्ट्रच नव्हे, तर देशाला सुवर्ण युगाकडे नेणारी ठरो. चेंबरचा कार्यक्रम हाच या वाटचालीचा संकल्प ठरावा.

Governer Bhagatsingh Koshiyari
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामागे भाजपच ; राऊतांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या उत्तर महाराष्ट्र शाखेच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात ते बोलत होते. पालकमंत्री छगन भुजबळ, चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, वरिष्ठ उपाध्यक्ष उमेश दाशरथी, सुधाकर देशमुख उपस्थित होते.

श्री. कोश्यारी म्हणाले, की चेंबरला सुवर्णमहोत्सव आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव, चैत्री नवरात्रोत्सव, प्रभू श्रीरामाच्या भूमीतील रविवारी श्रीराम नवमी असे सगळे योग जुळून आले आहेत. नशिक हे नावाप्रमाणेच नाकासारखे सरळ आहे. सांस्कृतिक राजधानी आहे, तसे वाइन कॅपिटलही आहे.

ते पुढे म्हणाले, नाशिकचा एक भाग प्रचंड विकसित आहे, तर काही भाग अतिशय उपेक्षित आहे. विदर्भ, मराठवाडा उपेक्षित असल्याचे ऐकले होते. पण, उत्तर महाराष्ट्रही विकासापासून दूर असल्याचे जर भुजबळांसारखे ज्येष्ठ नेते म्हणत असतील, तर नाशिकच्या विकासाचा संकल्प केला पाहिजे. उद्योगाचा विकास झाला पाहिजे; पण पर्यटन विकासासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे.

नाशिक जिल्हा हा कृषी समृद्धीसाठी ओळखला जातो. उत्तराखंडहून लोक नाशिकमधील शेतीचे प्रयोग पाहायला येतात. हेच इथले वेगळेपण आहे. त्यामुळे उद्योगाच्या विकासाचा विचार करताना इथल्या शेतीच्या विकासाचा फोकस ठेवावा. स्वतःसोबतच लहान-लहान घटकांच्या विकासातून उत्तर महाराष्ट्राच्या विकासाकडे लक्ष दिले जावे. विकासाच्या प्रक्रियेत मजूर, कामगार हा घटकही तितकाच महत्त्वाचा आहे. गोल्डन एजकडे जाण्याचा विचार करताना ‘गोल्डन सेकॅ हॅण्ड’च्या घटना कमी घडाव्यात. त्यामुळे कामगार आणि मजुरांचा जेवढा जास्त विचार कराल, तेवढा या भागाचा अधिक विकास होईल. विकासात शासन-प्रशासन हे निमित्त आहे.

---

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com