Graduate Constituency News; 7 अर्ज बाद; 22 उमेदवार शिल्लक राहिले!

नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणूकीत सत्यजित तांबे यांचा अपक्ष अर्ज वैध
Satyajeet Tambe
Satyajeet TambeSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची आज छाननी झाली. यावेळी सात उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. आता निवडणूकीसाठी 22 उमेदवारांचे अर्ज शिल्लक आहेत. माघारीच्या तारखेपर्यंत कोण माघार घेतो, याची उत्सुकता आहे. (22 candidates arein a valid list of graduate constituency election)

Satyajeet Tambe
Congress news; डॉ. सुधीर तांबे यांनी तीन महिने काय केले?

विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी राधाकृष्ण गमे आणि सहाय्यक निर्णय अधिकारी, उपायुक्त रमेश काळे यांच्या उपस्थितीत छाननी झाली. यावेळी विविध उमेदवार उपस्थित होते. निवडणुकीत 29 उमेदवारांनी 44 उमेदवारी अर्ज दाखल केले होते, अशी माहिती श्री. काळे यांनी दिली.

Satyajeet Tambe
Nashik News: नाशिक पदवीधर मतदारसंघ; तांबे पिता-पुत्रांवर काँग्रेस आता काय कारवाई करणार ?

यावेळी सोमनाथा नान गायकवाड, सुनील शिवाजी उदमळे, शरद मंगा तायडे, राजेंद्र मधुकर भावसार, यशवंत केशव साळवे आणि छगन भिकाजी पानसरे या सात जणांचे अर्ज बाद ठरले.

या निवडणुकीत 29 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यातील सात जणांचे अर्ज बाद झाले. बावीस उमेदवार शिल्लक आहेत. त्यात चर्चीत सत्यजीत तांबे यांचा अर्ज वैध ठरला. सुरेश भिमराल पवार (नॅशनल ब्लॅक पँथर), दादासाहेब हिरामण पवार (हिंदूस्तान जनता पार्टी) आणि रतन कचरू बनसोडे (वंचित बहुजन आघाडी) या तीघांचे अर्ज अमान्यताप्राप्त आहेत.

निवडणुकीत काल काय घडले...

गुरुवारी (ता. १२) अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या होत्या. नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर या पाच जिल्ह्यांच्या आणि ५४ तालुक्यांच्या मतदारसंघासाठी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांनी माघार घेऊन मुलगा सत्यजित तांबे याने अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे अनेकांची ही निवडणुक चर्चेत आली.

आमदार तांबे यांनी तरुणांना संधी देण्याची गरज आहे. त्यासाठी उमेदवारी केली नाही, असा दावा केला आहे. मात्र डॉ. तांबे यांची उमेदवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 7 ऑक्टोबरला मुंबईत जाहीर केली होती. यावेळी श्री. पटोले यांनी अन्य मतदारसंघांचा निर्णय सुरु आहे. मात्र आमदार तांबे यांना पुन्हा संधी देण्यात येईल. या बातम्या सर्वत्र प्रसिद्ध झाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com