Gram Panchayat Election: भाजप-शिंदे गटात तुफान हाणामारी ; २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

जळगावातील मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा व उचंदे या दोन ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंनी गड राखला.
Gram Panchayat Election Jalgaon
Gram Panchayat Election Jalgaon
Published on
Updated on

Gram Panchayat Election : जळगाव जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाला गालबोट लागले आहे. जामनेर तालुक्यातील टाकळी गावात दोन गटात तुफान हाणामारी आणि दगडफेक झाल्याने एका २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. धनराज माळी असे या तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर जिल्हा रुग्णालयात एकच गोंधळ उडाला होता.

धनराज माळी हा भाजप कार्यकर्ता होता. टाकळी खुर्द येथील ग्रामपंचायत निवडणूक निकालानंतर विजयी झालेल्या उमेदवारांनी गावात प्रवेश केल्या-केल्याच त्यांचेवर पराभूत झालेल्या विरोधकांकडीन तुफान दगडफेक करण्यात आली. यात धनराजचा मृत्यु झाला. या प्रकरणी पोलि सांनी संशयितांची धरपकड करून सुमारे २०-२५ जणांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे. गावामधे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

Gram Panchayat Election Jalgaon
Gram Panchayat Election Result live Update : फडणवीसांना धक्का; दत्तक घेतलेल्या फेटरी गावात राष्ट्रवादीचा झेंडा

जळगावातील  मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा व उचंदे या दोन ग्रामपंचायतीवर एकनाथ खडसेंनी गड राखला. भाजप शिंदे गटाने जोरदार ताकद लावूनही कुऱ्हा य ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनल विजयी झाले आहे. कुऱ्हा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचे बिपिन महाजन यांचे पॅनल विजय झाले आहे. तर उचंदे ग्रामपंचायतीवर अपक्ष उमेदवाराचा विजय झाला आहे. याशिवाय, संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या जामनेर तालुक्यातील मोहाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपचे गुजरात प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सी. आर. पाटील यांची कन्या भाविनी पाटील यादेखील विजयी झाल्या आहेत.

यासोबतच आटपाडी तालुक्यातील गळवेवाडीतही असाच प्रकार समोर आला आहे. गळवेवाडीत भाजप आणि शिंदे गटात तुफान वादावादी आणि मारामारी झाली. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान पार पडले. पण लढतीपूर्वी एकाच पक्षात आणि चांगले सख्य असलेले दोन नेते दोन पक्षात विभागले गेले. याचं कारण ठरली ती म्हणजे सरपंच पदावरील दोन दशकांची मक्तेदारी. त्यातच मतदानाच्या दिवशी किरकोळ कारणावरून भाजप आणि शिंदे गटात सुरुवातीला वादावादी झाली. पण काही वेळातच त्याचे रुपांतर हाणामारीत झाले

मतदानानंतर काल (१९ डिसेंबर) सकाळी परत एकदा वादाला तोंड फुटले. गळवेवाडी मध्ये पुन्हा भाजप आणि शिंदे गटात वादावादी झाली. उमेदवार आणि समर्थक तक्रार देण्यासाठी आटपाडी पोलीस ठाण्यात पोहचले. पोलीस ठाण्याच्या आवारात दोन्ही गटात दोन वेळा दोन वेळा बाचाबाची आणि वादावादी झाल्याने पोलीस ठाण्याच्या आवारातच दोन्ही गट एकमेकांना भिडले. त्यामुळे ठाण्याच्या आवारातच झालेला हा गोंधळ थांबवण्यासाठी पोलीसांनी लाठीचार्ज केला. पोलिसांनी जमावातील महिलांवरच काठ्या उगारल्याने एकच गोंधळ उडाला. त्यानंतरही पोलिसांनी राजकीय हस्तक्षेपातून एका गटाची बाजू घेतल्याचा आरोप जमावातील कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. शेवटी पोलीस ठा्याचे निरीक्षक शरद मेमाणे यांनी दोन्ही गटाच्या प्रमुख व्यक्तीसोबत चर्चा करुन या वादावर पडदा टाकला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com