Gram Panchayat Election Results : श्रीगोंद्यात पाचपुते, जगताप, नाहाटांनी राखले गड!

Srigondia Gram Panchayat Election : दहा पैकी आठ ग्रामपंचयातीमध्ये झाले सत्ता परिवर्तन
Srigondia Gram Panchayat Election
Srigondia Gram Panchayat ElectionSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : नगर जिल्ह्यातील श्रीगोंदे तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी झाली. यात आठ ग्रामपंचयातीमध्ये सत्ता परिवर्तन झाले. त्यामध्ये भाजप आमदार बबनराव पाचपुते, माजी आमदार राहुल जगताप, जिल्हा काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे आणि बाळासाहेब नाहाटा यांनी आपआपले गड ताब्यात ठेवले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Srigondia Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Results : '' फडणवीसांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणाऱ्यांना... '' ; दरेकरांचा विरोधकांना टोला!

श्रीगोंद्यात लोणी व्यंकनाथ आणि देवदैठन येथे सत्ताधाऱ्यांना सत्ता राखता आली. घुटेवाडी ग्रामपंचायत निवडणूक आगोदरच बिनविरोध झाली होती. भाजप आमदार पाचपुते गटाने देवदैठन, कोळगाव, आनंदवाडी येथील सत्ता काबीज केली.

माजी आमदार राहुल जगताप यांच्या गटाने पेडगाव, टाकळी लोणार, तर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांच्या गटाने विसापूर, मढेवडगाव येथील दोन ग्रामपंचायतीत सत्ता मिळवली. राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा यांच्या गटाने एका ग्रामपंचायतीवर सत्ता काबीज केली. श्रीगोंद्यात दोन ठिकाणी स्थानिक आघाड्यांना यश आले.

कोळगाव ग्रामपंचायतीत पाचपुते गटाचे माजी सभापती पुरुषोत्तम लगड आणि माजी आमदार राहुल जगताप गटाचे माजी सरपंच हेमंत नलगे यांच्यात लढत झाली. या लढतीकडे तालुक्याचे लक्ष लागले होते. यात पुरुषोत्तम लगड विजयी झाली. हेमंत नलगे यांच्याकडे सुमारे 30 वर्षांपासूनची असलेली सत्तेला माजी सभापती पुरुषोत्तम लगड यांनी सुरुंग लावला.

लोणी व्यंकनाथ येथे राज्य बाजार समितीचे सभापती बाळासाहेब नाहटा गटाने एक हाती सत्ता राखून ठेवली. सरपंच पदासाठी मनीषा नाहाटा यांनी विजय मिळवला. त्यांनी पाचपुते-नागवडे गटाच्या प्रतिभा नगरे यांचा पराभव केला. लोणी व्यंकनाथमध्ये नाहाटा गटाने 11 जागा जिंकल्या.

Srigondia Gram Panchayat Election
Andheri Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीला वर्ष पूर्ण, आता मतदारराजा कोणाला देणार कौल?

विसापूर येथे सरपंच निवडणुकीत नागवडे गटाच्या रुपाली जठार यांनी बाजी मारली. येथे सदस्यांमध्ये पाचपुते, जगताप आणि नागवडे गटांना प्रत्येकी तीन जागा मिळाल्या. देवदैठण येथे पाचपुते गटाने सत्ता मिळवली. जयश्री विश्वास गुंजाळ या सरपंच पदावर विजयी झाल्या. सदस्यांमध्ये पाचपुते गटाने अकरापैकी आठ जागा जिंकल्या. टाकळी लोणार येथे जगताप गटाच्या अर्चना दरवडे यांनी सरपंच पदी विराजमान झाल्या. येथे अकरापैकी सात जागा जिंकत जगताप गटाने बहुमत मिळवले. पाचपुते गटाला चार जागांवर समाधान मानावे लागले.

अधोरेवाडी येथे अशोक येडे यांच्या मंडळाचे अजित लकडे सरपंच पदावर विजयी झाले. तिथे येडे यांच्या मंडळाने सातपैकी चार जागा जिंकल्या. पेडगाव येथे जगताप-नागवडे गटात सरळ लढत झाली. यात जगताप गटाचे इरफान पिरजादे सरपंच पदावर विजयी झाले. जगताप गटाने येथे तेरापैकी 8 जागा जिंकल्या. मढेवडगाव येथे अटीतटीची लढत पाहायला मिळाली. नागवडे गटाच्या प्रमोद शिंदे यांनी सरपंच पदावर अवघ्या 11 मतांनी विजय मिळवला. मढेवडगाव येथे तेरापैकी दहा जागा नागवडे गटाने जिंकल्या. याठिकाणी माजी सरपंच महानंदा मांडे यांचे पती फुलसिंग मांडे यांच्या गटाचा पराभव झाला.

Srigondia Gram Panchayat Election
Gram Panchayat Election Results : शिंदेंची बुलंद तोफ! गुलाबराव पाटलांनी जळगाव ग्रामीणवरील वर्चस्व केले सिद्ध

आनंदीवाडी येथे पाचपुते गटाच्या छाया ढमढेरे यांनी सरपंच पदावर विजयी झाल्या. तिथे अकरापैकी पाच जागा पाचपुते गटाने जिंकल्या. कामठी येथील सदस्य पदाच्या एका जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत भाऊसाहेब आरडे विजयी झाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com