Mumbai News : राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल आज लागले आहेत. यामध्ये भाजपाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. त्यापाठोपाठ अजित पवार गट आणि शिंदे गटाला यश मिळालं आहे. यामुळे या निवडणुकीत महायुतीचं पारडं हे महाविकास आघआडीच्या तुलनेत भारी ठरलं आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गोटात जल्लोष पाहायला मिळत आहे.
भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावर मीडियाशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरेकर म्हणाले, ''भाजपाने ग्रामपंचायत निवडणुकीत 750 एवढ्या जागा जिंकून दैदिप्यमान असं यश प्राप्त केलं आहे. आमच्यानंतर अजित पवारांचा गट आणि शिंदेंची शिवसेना असं मिळून, जवळपास ७० टक्के जागा महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत जिंकल्या आहेत आणि भाजपासाठी तर मोठं बहुमत मिळालं आहे.''
मागील काही आठवड्यातील वातावरणातून भाजपाला लक्ष्य करण्याचा काही हीत शत्रूंनी प्रय़त्न केला. देवेंद्र फडणवीसांवर टीका टिप्पणी करून, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी कधी प्रतीकार केला नाही, त्यांनी सातत्याने सांगितलं की आम्ही काम करणारी लोक आहोत, विकासाचं राजकारण आम्ही करतो. ग्रामपंचायत हा आपला राजकारणाचा पाया आहे. याच निवडणुकीत भाजपाला प्रचंड यश मिळालं आहे. याचा अर्थ संपूर्ण महाराष्ट्राचा ग्रामीण भाग हा भाजपासोबत आहे.
लोकांना सूडाच्या, टीकेच्या राजकारणाऐवजी विकासाचं राजकारण आवडतं. हा संदेश महाराष्ट्रातील जनतेने दिला आहे. कारण पंतप्रधान मोदी विकासाची भाषा बोलतात. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे विकासाची भाषा बोलतात. विकासाभिमूख काम केलं जातं, त्यामुळे जनतेला भावनिक गोष्टींपेक्षा विकासाचं राजकारण हवं आहे. हे राजकारण महायुती करू शकते यावर प्रचंड ताकदीने राज्यभरातील जनतेने शिक्कामोर्तब केला आहे. देवेंद्र फडणवीसांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभा करणाऱ्यांना जनतेने चपराक दिली आहे.
कारण, ज्या ग्रामपंचायती आहेत त्यामध्ये मराठा समाजाचे प्रतिनिधी सुद्धा मोठ्या संख्येने आहेत. ही मराठा समाजाची भावना आहे. मराठा समाजाच्य प्रश्नासोबत भाजपा आहे, देवेंद्र फडणवीसांनीच आरक्षण दिलं होतं. हे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं आहे आणि भविष्यातही फडणवीसांच्या पुढाकारानेच या गोष्टी मार्गी लागणार आहेत. हा विश्वास महाराष्ट्रातील जनतेला आहे. विकासाभीमूख राजकारण करणारा नेता म्हणून फडणवीसांवर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.