आमदार खोसकरांच्या इशाऱ्याने दादा भुसेंनी केली मध्यस्थी

पालकमंत्री दादा भुसे यांनी मध्यस्थी करीत आमदारांचे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय झाला.
Dada Bhuse & Hiraman Khoskar
Dada Bhuse & Hiraman KhoskarSarkarnama
Published on
Updated on

नाशिक : प्रशासकीय मंजुरी (Administration Approval) असताना केवळ अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे मंजूर कामे रद्द झाल्याचा आरोप आमदार हिरामण खोसकर (MLA Hiraman Khoskar) यांनी शुक्रवारी लाक्षणिक उपोषण (Hunger strike) करण्याचा इशारा दिला होता. (Congress MLA Hiraman Khoskar`s Agitation against ZP)

Dada Bhuse & Hiraman Khoskar
अब्दुल सत्तार शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत

त्यानंतर पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) याप्रकरणात मध्यस्थी करत रद्द कामांबाबत अधिकारी माहिती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांना दिल्या. तसेच योग्य कार्यवाहीचे आश्‍वासन मिळाल्याने आमदार खोसकर यांचे आंदोलन स्थगित झाले.

Dada Bhuse & Hiraman Khoskar
`सारथी`च्या माध्यमातून नोकऱ्या देणारे तयार व्हावेत!

याबाबत त्यांनी जिल्हा परिषद मुख्य आमदार हिरामण खोसकर यांनी कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत कामे रद्द झाल्याबाबत आपला रोष व्यक्त केला. यावेळी आमदार ॲड. माणिकराव कोकाटे देखील सीईओंच्या दालनात उपस्थित होते. प्रशासनाने कामांबाबत योग्य निर्णय न घेतल्याने न्यायालयात या प्रकरणी दाद मागण्याचा इशारा दिला.

आमदार खोसकर यांची मूलभूत सुविधांची सुमारे पाच कोटी रुपयांची ५४ कामे जिल्हा परिषद प्रशासनाकडून रद्द करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतून मंजूर करण्यासाठी असलेल्या विकासकामांसाठी १४ ते १९ जुलै या दरम्यान कागदपत्रे मागविले होते. आमदार खोसकर यांनी सुचविलेल्या कामांची कागदपत्रे हे वेळेत सादर न झाल्याने ती कामे रद्द झाल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र आपण सर्व कामांचे कागदपत्रे ही वेळेत दिली असल्याचा दावा देखील आमदार यांनी केला. वेळेत कागदपत्रे देवून केवळ अधिकाऱ्यांच्या असमन्यवयामुळे आपल्याला अडीच महिने उलटूनही कार्यारंभ आदेश दिला नसल्याचा आरोप खोसकर यांनी केला.

यामुळे आमदार खोसकर यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवारी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा दौरा असताना आमदार खोसकर यांनी मतदारसंघातील सर्व सरपंचासह उपोषणाला बसण्याची तयारीही केली होती. यापार्श्वभूमीवर पालकमंत्री दादा भुसे यांनी आमदारांच्या रद्द कामांबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी संपर्क या कामांबाबत माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. त्यांनतर आमदार खोसकर यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची भेट घेत तक्रारींचा पाढा वाचला. त्यानंतर या प्रकरणी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे आश्‍वासन मिळाल्यानंतर आंदोलन स्थगित केले.

---

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com