Jalgaon News : राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि धुळे,लातूर,नांदेड जिल्ह्यांचे पालकमंत्री गिरीश महाजन हे यंदा १५ ऑगस्टला नाशिक येथे झेंडावंदन करणार आहेत. नाशिक हे मंत्री महाजनांचे आवडते कार्यक्षेत्र असल्याने ते यंदा नाशिकमध्ये झेंडावंदन करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून पुन्हा एकदा शिंदे-आणि फडवणीवस गट
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री शिंदे गटाचे दादा भुसे आहे. याठिकाणी अजित पवार गटाचे छगन भुजबळही मंत्री आहेत. सत्तासंघर्षानंतर, मुंबई, पुण्यानंतर भाजपसाठी नाशिक हे महत्वाचे शहर मानले जाते. नाशिकचे पालकमंत्री पद गिरीश महाजनांनी भूषविले . तसेच नाशिकमध्ये भाजप वाढीसाठी त्यांनी प्रयत्न केल्याचे जगजाहीर आहे.
राज्यात शिंदे फडणवीस यांचे सरकार आल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री पद दादा भुसे यांच्याकडे आले,तर गिरीश महाजन यांच्याकडे धुळे,लातूर,नांदेडचे पालकमंत्री पद आले त्यावेळी भाजपने महाजन यांना नाशिकमधून हटविले असे म्हंटले जात होते.परंतु आता पुन्हा त्यांच्या हस्ते नाशिक येथे १५ऑगस्ट चे झेंडावंदन होत असल्याने,भाजप आता पुन्हा नाशिक महाजन यांच्या कडे देण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे.
विशेष म्हणजे महाजन यांच्याकडे धुळे, लातूर,नांदेड या तीन जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. तरीही त्यांच्याकडे नाशिकच्या झेंडांवदनाची जबाबदारी देण्यात आली आहे. पण झेंडावंदनाच्या आडून भाजपटी या मागे काय रचना आहे. अशी शंका उपस्थित केली जात आहे .महाजन हे राज्याचे उपमुख्यमत्री भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे मानले जातात.या शिवाय भाजप आणि भाजप सरकारवर संकट आल्यास ते त्यातून बाहेर काढतात त्या मुळे त्यांना संकटमोचक असेही म्हटले जाते.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.