Sunil Kedar got angry : वडेट्टीवारांनी घेतलेल्या आढावा बैठकीत का संतापले सुनील केदार ?

Vijay Wadettiwar : नागपुरातील रविभवन येथे आढावा बैठक घेतली.
Sunil Kedar and Vijay Wadettiwar
Sunil Kedar and Vijay WadettiwarSarkarnama
Published on
Updated on

MLA Sunil Kedar was furious : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काल (ता. ११) नागपुरातील रविभवन येथे आढावा बैठक घेतली. यामध्ये नेत्यांची भाषणे सुरू होती. पण माजी मंत्री आमदार सुनील केदार एकदम संतापले. थोडा वेळ कुणाला काहीच कळले नाही आणि सुनील केदार का संतापले, अशी चर्चा सुरू झाली. (Looking at Rajendra Mulak, Kedar expressed displeasure)

झाले असे की, बैठकीत १३ पैकी ४ तालुकाध्यक्षांना बोलण्याची संधी देण्यात आली. भाषणासाठी कामठीचे तालुकाध्यक्ष नाना कंभाले यांचे नाव उच्चारताच सुनील केदार यांनी संताप व्यक्त केला. शेजारी बसलेले जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांच्याकडे बघून केदारांनी नाराजी दर्शवली.

केदारांच्या नाराजीमुळे कंभाले यांना केवळ दोनच मिनिटे बोलता आले. कंभाले यांनी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत बंडखोरी केली होती आणि सुनील केदार यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची धुरा खांद्यावर घेतली होती. त्यामुळे केदार कंभालेंवर उखडून आहेत.

खासदार नसताना आणि जिल्ह्यात दोनच आमदार असताना आपण जिल्हा परिषद जिंकू शकतो, तर मग रामटेक लोकसभा मतदारसंघ का नाही, असा सवाल उपस्थित करून रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक विजय वडेट्‍टीवार यांनी कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले.

Sunil Kedar and Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

रविभवन येथे वडेट्‍टीवार यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री व सावनेरचे आमदार सुनील केदार, आमदार अभिजित वंजारी, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, प्रदेश उपाध्यक्ष किशोर गजभिये, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे, उपाध्यक्ष कुंदा राऊत, अमोल देशमुख, सुरेश भोयर यांच्यासह चंद्रपाल चौकसे, हुकुमचंद आमधरे, जयंत दळवी आदी प्रामुख्याने उपस्थित होते.

केदारांचे तोंडभरून कौतुक..

वडेट्‍टीवार म्हणाले, मी आणि सुनील केदार असे नेते आहोत, जेथे हात घातला तिथे हमखास यश मिळवतो. पक्षाने जबाबदारी दिली तर निश्चित रिझल्ट देतो. तुम्हा सर्वांना याचा अनुभव आहेच. ‘पटे तो टेक नही तो रामटेक’, असे आमचे धोरण आहे. मात्र यासाठी तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे.

Sunil Kedar and Vijay Wadettiwar
Vijay Wadettiwar On Amit Shah: '' खोटं बोलून देश चालवला जात आहे..''; वडेट्टीवार अमित शाहांवर बरसले !

ईगो बाजूला ठेवा..

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्याने अनेक नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते द्विधा मन:स्थितीत आहेत. अशांना जोडण्यासाठी ईगो बाजूला ठेवून एक पाऊल पुढे टाका आणि त्यांच्याशी संपर्क साधा. आगामी सहा महिन्यांतील १८० दिवस घरोघरी संपर्क साधा, नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही तरी, विचारपूस करून त्यांना भावनात्मक साद घाला.

प्रत्येक वॉर्डात जनतेशी संपर्क करून महागाई, बेरोजगारीवर चर्चा करावी. यातून पक्ष मजबूत होऊन, पक्षाला फायदा होईल. पक्ष फोडणारे आणि बंडखोरी करणाऱ्यांवर सर्वसामान्यांचा रोष आहे, याचा फायदा आपल्याला निवडणुकीत (Election) होणार असल्याचे विजय वडेट्‍टीवार (Vijay Wadettiwar) म्हणाले.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com