Ahmednagar News : गुहामधील धार्मिक वाद; टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी धडकले तहसील कचेरीवर

Guha Rahuri Warkari Protest : वारकऱ्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढल्याने पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता...
Ahmednagar News
Ahmednagar NewsSarkarnama
Published on
Updated on

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील गुहा येथील धार्मिक वाद प्रकरणात झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज मंगळवारी राहुरी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी हजारो वारकरी व गुहा तसेच पंचक्रोशीतील कानिफनाथ फक्त या मोर्चात सहभागी झाले होते. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथ भक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले होते.

गुहा येथील धार्मिक ठिकाणी दोन समाजात यापूर्वीही धार्मिक विधीवरून वाद टोकाला गेले आहेत. काही दिवसांपूर्वी याच पद्धतीने दोन्ही बाजूने वाद होत धार्मिक स्थळावर, तसेच गावात मोठ्या हाणामाऱ्या झाल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही बाजूच्या लोकांवर राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

Ahmednagar News
Abu Azami : सरकारला वाद वाढवायचाय; अबू आझमी आरोप करत वादाच्या स्थळी न येता फिरले मागे

या प्रकरणी कानिफनाथ मंदिरात दैनंदिन पूजा करणाऱ्या पूजाऱ्यांवर व भजन करणाऱ्या वारकऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ आज वारकरी व गुहा तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी राहुरी तहसील कचेरीवर मोर्चा काढला. टाळ-मृदंगाच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात हजारो वारकरी व नाथ भक्त वायएमसी ग्राउंडवर एकत्रित झाले. त्यानंतर अतिशय निघालेला मोर्चा नगर-मनमाड मार्ग, शहरातील मुख्य पेठ मार्गे राहुरी तहसीलवर धडकला. या वेळी रामकृष्ण हरी, कानिफनाथ महाराज की जय आदी जयघोष करण्यात आला.

या मोर्चात महंत उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, अर्जुन महाराज तनपुरे, आदिनाथ महाराज दुशिंग, किशोर महाराज जाधव , संजय महाराज शेटे, भगवान महाराज मोरे, नामदेव महाराज जाधव, श्रीकांत महाराज गागरे, नवनाथ महाराज आहेर, सुजित महाराज कदम, प्रमिला महाराज कोळसे आदींसह संत महंत व टाकळरी, वारकरी व नाथ भक्त सहभागी झाले होते. या वेळी उद्धव महाराज मंडलिक, पांडुरंग महाराज वावीकर, किशोर महाराज जाधव, अजय मांजरे, संपत महाराज जाधव , प्रा. एफ. झेड देशमुख यांनी आपल्या भावना प्रशासनासमोर मांडल्या.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मोठा पोलिस बंदोबस्त

> वारकरी व नाथभक्त यांच्या मोर्चास्थळी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक स्वाती भोर, डीवायएसपी संदीप मिटके, पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह शेकडो पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तहसील कचेरीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

नायब तहसीलदार पोलिस प्रशासनाने स्वीकारले निवेदन

> वारकरी, नाथभक्त व गुहा ग्रामस्थ यांनी वारकऱ्यांवर व पूजाऱ्यांवर हल्ला करण्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलिस प्रशासनाने स्वीकारले. पसायदानाने या मोर्चाची सांगता झाली.

Ahmednagar News
Abu Azmi News: 'अबू आझमी परत जा'; गुहामध्ये शेकडो तरुण रस्त्यावर...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com