Gulabrao Patil : ज्यांनी काळे झेंडे दाखवले, त्यांनाच अजित पवारांनी पक्षात घेतलं : गुलाबराव पाटील यांची खोचक टीका

Gulabrao Patil slams Ajit Pawar over Gulabrao Devkar’s entry into NCP : शिवसेना शिंदे गटाचे जळगावातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गुलाबराव देवकर यांनाही अजित पवार यांनी पक्षात घेतलं आहे. त्यामुळे पाटील यांनी देवकर यांच्यासह थेट अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
Gulabrao Deokar, Ajit Pawar & Gulabrao Patil
Gulabrao Deokar, Ajit Pawar & Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics Update : जळगाव जिल्ह्यातील शरद पवारांच्या पक्षाला खिंडार पाडत अजित पवारांनी मोठी खेळी खेळली आहे. दोन माजी मंत्री अन् दोन माजी आमदार यांच्यासह खानदेशातील अनेक स्थानिक नेते पुढारी अजित दादांनी गळाला लावले. त्यांचा पक्षात प्रवेशही करुन घेतला. मात्र त्यामुळे आता शिंदे शिवसेनेची डोकेदुखी वाढल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

शिवसेना शिंदे गटाचे जळगावातील नेते व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे कट्टर राजकीय विरोधक असलेल्या गुलाबराव देवकर यांनाही अजित पवार यांनी पक्षात घेतलं आहे. त्यामुळे पाटील यांनी देवकर यांच्यासह थेट अजित पवार यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. आमची इच्छा नसतानाही अजित पवार यांनी त्या सर्वांना पक्षात घेतलं. अजित पवार यांना पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

Gulabrao Deokar, Ajit Pawar & Gulabrao Patil
Pahalgam Terror Attack : 'त्या' सहा पाकिस्तानी महिला अजूनही नाशिकमध्येच, काय कारण?

गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवार यांच्यावर देवकर यांनी कायम टीका केल्या आहेत. अजित दादांना ज्यांनी काळे झेंडे दाखविले त्याच देवकरांना अजित दादांनी त्यांच्या पक्षात घेतलं आहे. हेच गुलाबराव देवकर आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो तेव्हा आम्हाला गद्दार म्हणत होते, खोके म्हणत होते. मग ते अजित पवार यांच्या पक्षात येऊन आता ओके झाले काय? असा सवाल गुलाबराव पाटील यांनी उपस्थित केला.

अजित पवार यांनी देवकर यांना पक्षात घेण्याआधी एकनाथ शिंदे साहेबांसोबत एकदा चर्चा करायला हवी होती. खरंच महायुतीचे हे धोरण आहे का म्हणून..,देवकर यांच्या जेव्हा शंभर गोष्टी बाहेर येतील तेव्हा अजित पवारही म्हणतील की गुलाबराव पाटील खरं म्हणत होते. भ्रष्टाचारावर पांघरुन घालण्यासाठी देवकर अजित पवारांच्या पक्षात गेले आहेत, पण गुलाबराव पाटील ही घाण साफ होऊ देणार नाही. खरं काय ते लोकांसमोर आणल्याशिवाय राहणार नाही असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला.

Gulabrao Deokar, Ajit Pawar & Gulabrao Patil
Nashik Kumbhmela Politics: धक्कादायक.... महायुतीच्या कोणत्या नेत्याला आहे कुंभमेळ्याच्या टेंडरमध्ये आहे रस?

देवकर यांनी अनेक भ्रष्टाचार केले आहेत. जिल्हा बँकेतून घेतलेले कर्ज, मजूर फेडरेशन मधील घोटाळा याबाबत त्यांच्या चौकश्या सुरू आहेत. असे असतानाही त्यांना पक्षात घेतले कसे? संबंधित खाते हे यांच्याकडे असल्याने ते दाबण्यासाठी देवकर तिकडे गेले असा आरोप गुलाबराव पाटील यांनी यावेळी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com