Gulabrao Devkar Politics : अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करूनही गुलाबरावांचा पाय खोलात, दहा कोटींच्या वसुलीसाठी जिल्हा बँक आक्रमक

Gulabrao Devkar; Shree Devkar in trouble for sanction of 10 cr loan to his own Education Institute asChairmen Of Dhule DCCBank-जिल्हा बँकेचे अध्यक्ष असताना स्वतःच्याच संस्थेला दहा कोटींचे कर्ज मंजूर केल्याने गुलाबराव देवकरांमागे लागला सहकार विभागाचा ससेमीरा
Gulabrao Devkar
Gulabrao DevkarSarkarnama
Published on
Updated on

Gulabrao Devkar News: राजकीय संकटांपासून सुटका व्हावी म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेशावेळी त्यांनी पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. या राजकीय अडचणी पक्ष प्रवेश झाला, तरी अद्यापही श्री. देवकर यांचा पिच्छा सोडण्यास तयार नाहीत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विरोधात उमेदवारी केली होती. त्यात त्यांचा पराभव झाला. निवडणूक निकालानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांना चांगलेच अडचणीत आणले होते.

विरोधी पक्षात राहून सत्ताधारी मंत्र्यांशी होणारा संघर्ष टाळण्यासाठी श्री. देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाला अजित पवार पक्षातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रखर विरोध केला होता. त्यामुळे हा प्रवेश काही काळ लांबणीवर पडला होता. मात्र श्री. देवकर यांनी अजित पवारांच्या पक्षातील प्रवेश जुळवून आणला.

Gulabrao Devkar
Sangrambapu Bhandare controversy : तथाकथित महाराजांचा 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा, थोरातांच्या पथ्यावर; कीर्तनांना हजेरी लावण्याच्या सपाटा, सत्ताधारी-विरोधक पुरते घायाळ

यासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी श्री. देवकर यांच्या धुळे जिल्हा बँकेतील कामकाजात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा दावा केला होता. त्याबाबत त्यांनी सहकार विभाग तसेच शासनाला पत्र लिहून तक्रार केली होती. दोन्ही गुलाबरावांतील हा राजकीय वाद अद्यापही मिटण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे सत्ताधारी महायुतीचा घटक पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ केल्यावर देखील देवकर यांच्या अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

जिल्हा सहकार उपनिबंधकांनी धुळे जिल्हा बँक अडचणीत आल्याचे कारण देत श्री. देवकर यांनी दहा कोटींचे थकीत कर्ज एक रक्कमी परतफेड योजनेद्वारे तातडीने भरण्याची नोटीस बजावली आहे. विविध प्रयत्न करूनही त्याबाबत सहकार विभागाची कारवाई सौम्य होण्याची चिन्हे नसल्याने श्री. देवकर चांगलेच त्रस्त झाले आहेत. सत्ताधारी पक्षात जाऊही त्याचा काहीच उपयोग झालेला नाही.

धुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष असतानाच्या कालावधीत शैक्षणिक संस्थेला सर्व नियमांची पुर्तता करून कर्ज घेतले आहे. त्याला संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी घेण्यात आली. अन्य संचालकांशी संबंधीत संस्थांनाहीकर्ज मंजूर आहे. मात्र केवळ मलाच टार्गेट केले जात असल्याची नाराजी माजी मंत्री देवकर यांनी व्यक्त केली आहे. एकंदरच सत्ताधारी पक्षात जाऊनही श्री. देवकर यांच्या राजकीय अडचणी कमी होण्याची चिन्हे नाहीत.

------

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com