Sangrambapu Bhandare controversy : तथाकथित महाराजांचा 'नथूरामजी गोडसे' होण्याचा इशारा, थोरातांच्या पथ्यावर; कीर्तनांना हजेरी लावण्याच्या सपाटा, सत्ताधारी-विरोधक पुरते घायाळ

Balasaheb Thorat Attends Harinam Saptah Kirtan in Sangamner After Sangrambapu Bhandare Controversy : काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताहांमधील कीर्तनांमध्ये सहभागी होण्यावर भर दिला आहे.
Sangrambapu Bhandare controversy
Sangrambapu Bhandare controversySarkarnama
Published on
Updated on

Harinam Saptah Kirtan Sangamner : तथाकथित कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या संगमनेरमधील घुलेवाडीतील राजकीय कीर्तन आणि त्यातील गोंधळानंतर हिंदुत्वावादी संघटना चांगलेच आक्रमक झाल्या होत्या. संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या समर्थनात मोर्चा निघताच, कीर्तनातील हल्ला केल्याचा आरोप करताना, 'नथूरामजी गोडसे' होण्याची भाषा वापरली.

काँग्रेसचे मुरब्बी नेते थोरातांनी हेच हेरलं अन् आरोपांना राज्यघटनेतील मुलभूत तत्त्वाचा दाखल देत, असा नथूराम गोडसे समोर आल्यावर विचार अन् तत्त्वांसाठी आनंदानं बलिदान स्वीकारेल असं भावनिक विधान केलं. बाळासाहेब थोरात आता एवढ्यावर थांबले नसून, तालुक्यातील अखंड हरिनाम सप्ताहामधील कीर्तनांमध्ये सहभागी होण्याचा सपाटा लावला आहे. थोरातांची ही कृती म्हणजे, सत्ताधारी विरोधकांबरोबर हिंदुत्वावादी संघटनांची कोंडी केली आहे.

कीर्तनकार संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या संगमनेरच्या घुलेवाडीतील कीर्तना राजकीय गोंधळ झाला. थोरात समर्थकांनी कीर्तनात हल्ला केला, गाडी फोडली, यामुळे कीर्तन सोडून जावे लागले. यानंतर संगमनेरमध्ये हिंदुत्वादी (Hindu) संघटनांनी भंडारे महाराज यांच्या समर्थनात मोर्चा काढून थोरात आणि त्यांच्या समर्थकांना इशारा दिला. संग्रामबापू भंडारे महाराजांनी समाज माध्यमांवर व्हिडिओ शेअर करत 'नथूरामजी गोडसे' व्हायला नका लावू असा इशारा देत थोरातांना डिवचलं.

बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी या सर्व आरोपांना काल पत्रकार परिषद घेऊन संयमानं उत्तर दिलं. असा 'नथूराम गोडसे' समोर आल्यावर विचार आणि तत्त्वांशी तडजोड न करता आनंदानं बलिदान स्वीकारील, असे जोरदार प्रत्युत्तर दिलं. यानंतर संगमनेर तालुक्यातील आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांमधील कीर्तनांना हजेरी लावत सत्ताधारी विरोधकांना सूचक इशारा देत कोंडी केली.

Sangrambapu Bhandare controversy
Balasaheb Thorat On Election : निवडणूक आयुक्तांवर महाभियोग? राजकीय 'स्टाइल', प्रेसचा 'ड्राफ्ट', राहुल गांधींना नोटीस अन् थोरातांचा 'बोचरा' सल्ला !

बाळासाहेब थोरातांनी गेल्या काही तासांमध्ये संगमनेरमध्ये आयोजित तब्बल पाच पेक्षा जास्त ठिकाणच्या अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तनांत सहभागी झाले. जोर्वे, माळेगांव हवेली, वडगावपान, निळवंडे, तळेगाव दिघेच्या भागवतवाडी इथं आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले. यावेळी त्यांच्याभोवती युवकांची मोठी गर्दी होती. कीर्तनांमध्ये त्यांचं भगवी शाल घालून सत्कार करण्यात आले.

Sangrambapu Bhandare controversy
CM Rekha Gupta Attacked: CM रेखा गुप्ता यांना कानाखाली मारल्या; भाजपच्या दिल्लीतील जनता दरबारात हल्लेखोराचा गोंधळ

थोरातांनी अखंड हरिनाम सप्ताहमधील कीर्तनांना लावलेल्या हजेरीमुळे सत्ताधारी विरोधक आणि हिंदुत्ववादी संघटनांची चांगलीच कोंडी झाली आहे. संगमनेरची विकासाची वाटचाल सुरूच ठेवणार यासाठी विचारसरणी आणि तत्त्वांशी तडजोड करणार नसल्याचा सूचक इशारा थोरातांनी यानिमित्ताने दिल्याची चर्चा आहे.

दरम्यान, बाळासाहेब थोरातांना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ उद्या गुरूवारी (ता.21) विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सत्ताधारी आणि हिंदुत्ववादी संघटनांना संग्रामबापू भंडारे महाराज यांच्या समर्थनात मोर्चा काढला होता. यानंतर थोरातांवर करण्यात आलेल्या आरोपांना आणि दिलेल्या धमकीच्या निषेधासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात येत आहे. या मोर्चातून थोरात संगमनेरमध्ये मोठं शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com