Gulabrao Patil : मंत्री गुलाबराव पाटील यांचे उत्पन्न लाखातून थेट कोटीत!

Income Increased from Lakhs to Crores: शिवसेना शिंदे पक्षाचे नेते गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला
Gulabrao Patil
Gulabrao PatilSarkarnama
Published on
Updated on

Shinde Shiv Sena News: शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र जोडले आहे. या माहितीनुसार मंत्री पाटील यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाली आहे.

राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आपल्या अर्ज दाखल केला. या अर्जासोबत त्यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आपल्या मालमत्तेचे विवरणपत्र सादर केले आहे. या पत्रानुसार मंत्री पाटील यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसते.

मंत्री पाटील यांनी सादर केलेल्या विवरणपत्रात ते आणि त्यांच्या पत्नी मायाबाई हे दोघेही प्राप्तिकर भरतात. त्यांनी 2019 मध्ये सादर केलेल्या प्राप्तिकर विवरण पत्रानुसार त्यांचे उत्पन्न 25.९८ लाख रुपये होते. त्यांच्या पत्नीचे उत्पन्न 2.23 लाख रुपये होते.

नुकत्याच सादर केलेल्या मावळत्या वर्षातील प्राप्तिकर विवरण पत्रानुसार गुलाबराव पाटील यांचे उत्पन्न १.७३ कोटी रुपये आहे. केल्या पाच वर्षात हे उत्पन्न सुमारे सात पटीने वाढल्याचे आढळते.

Gulabrao Patil
Congress Politics: काँग्रेस नेत्यांना चुका भोवल्या; नाशिकमध्ये बंडखोरांनी आदेश धुडकावले, उमेदवारीवर ठाम!

मंत्री पाटील यांच्याकडे निवडणुकीसाठी २.७३ लाख आणि पत्नी मायाबाई यांच्याकडे १.२३ लाख रुपयांची रोकड आहे. गुलाबराव पाटील यांचे विविध बँकांमध्ये खाती आहेत. या बँक खात्यांमध्ये त्यांचे ३८.७८ आणि पत्नी मायाबाई यांचे ४.३१ लाख रुपये जमा आहे.

मंत्री पाटील यांच्याकडे विविध संस्थांचे २.८६ लाख रुपयांचे बंधपत्रे आहेत. त्यांच्याकडे १२ लाख रुपयांचे बचत पत्र देखील आहेत. त्यांनी विविध १४ संस्थांमध्ये गुंतवणूक केली आहे. ही गुंतवणूक २.३८ कोटी रुपये आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे मंत्री पाटील आणि त्यांच्या पत्नी मायाबाई पाटील यांच्याकडे २९० ग्राम असे २३.२० लाख रुपये किमतीचे सोने आहे. त्यांनी काही व्यवसायांमध्ये गुंतवणूक देखील केली आहे. त्यातील एका संस्थेत केलेली गुंतवणूक वजा झाली आहे. तर अन्य संस्थांची गुंतवणूक १९.९१ लाख रुपये आहे. या सबंध मालमत्तेचे मूल्य ३.३४ कोटी रुपये आहे.

Gulabrao Patil
Manoj Jarange Patil: छगन भुजबळांच्या विरोधात उमेदवार कोण? जरांगे पाटील यांचे ठरेना!

मंत्री पाटील यांचे चांदसर, एकलग्न (धरणगाव) यांचं काही गावांमध्ये शेतजमीन आहे. याशिवाय विविध ठिकाणी बिगर शेती जमिनी देखील आहेत. त्या सगळ्यांचे मूल्य सुमारे १.५४ कोटी रुपये आहे. याशिवाय शेतीचे मूल्य देखील काही लाखांत आहे.

विशेष म्हणजे मंत्री पाटील यांचे धरणगाव येथे स्वतःचे घर आहे. याशिवाय त्यांनी मुंबईत अंधेरी येथे तसेच ठाणे पश्चिम आणि मरीन पॅलेस येथे सदनिका घेतल्या आहेत. या सध्या निकांचे मूल्य ६.२६ कोटी रुपये आहे.

मंत्री पाटील यांनी सादर केलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रानुसार एकंदर त्यांची जंगम मालमत्ता ३.८० कोटी रुपये, स्थावर मालमत्ता ५.९५ कोटी असून त्यांच्यावर विविध संस्थांचे २.१४ कोटी रुपयांचे देणे आहे. त्यांच्याकडे टोयोटा फॉर्च्यूनर ही गाडी आहे.

मंत्री पाटील हे शिवसेना पक्षाचे आमदार म्हणून २०१९ मध्ये जळगाव ग्रामीण मतदारसंघातून विजयी झाले होते. राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला. यंदा ते जळगाव ग्रामीण मतदार संघातून शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे उमेदवार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com